साक्षीदारांच्या अर्जावर उद्या सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:50 AM2018-05-15T06:50:50+5:302018-05-15T06:50:50+5:30

कथुआ येथील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील तीन साक्षीदारांनी राज्याचे पोलीस आमचा छळ करीत असल्याच्या केलेल्या आरोप अर्जावर सर्वोच्च न्यायालय १६ मे रोजी सुनावणी घेणार आहे.

Hearing on witnesses' application tomorrow | साक्षीदारांच्या अर्जावर उद्या सुनावणी

साक्षीदारांच्या अर्जावर उद्या सुनावणी

Next

नवी दिल्ली : कथुआ येथील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील तीन साक्षीदारांनी राज्याचे पोलीस आमचा छळ करीत असल्याच्या केलेल्या आरोप अर्जावर सर्वोच्च न्यायालय १६ मे रोजी सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमुर्ती ए. एम. खानविलकर व डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे. या खंडपीठाने साहिल शर्मा व इतर दोघांनी केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी घेण्यास सोमवारी मान्यता दिली.
यातील अल्पवयीन आरोपीचे हे तिघे मित्र आहेत. आम्ही पोलिस आणि दंडाधिकाऱ्यांपुढे आधीच म्हणणे मांडले आहे, असे याचिकेत त्यांनी म्हटले. साक्षीदारांनी दंडाधिकाºयांपुढे केलेल्या निवेदनात आम्ही पोलिसांकडे मांडलेले म्हणणे आमच्याकडून सक्तीने करून घेण्यात आल्याचे सांगितले. आता पोलिस आम्हाला तुम्ही पुन्हा हजर व्हा व तुमचे म्हणणे पुन्हा नमूद करा, असे सांगत आमच्या कुटुंबियांवर दडपण आणत आहेत, असा आरोप या याचिकेत सोमवारी करण्यात आला आहे.

Web Title: Hearing on witnesses' application tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.