हृदयद्रावक! करोडपती झाल्यानंतर पत्नीसाठी लेकाने आईला काढलं घराबाहेर; मजुरी करुन भरते पोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 03:14 PM2023-05-15T15:14:50+5:302023-05-15T15:18:55+5:30

मुलगा बायकोचे कपडे आईकडून धुवून घ्यायचा, बायकोच्या हातापायांना मसाज करायला सांगायचा आणि आईसमोर एक अट ठेवायचा की घरात राहायचे असेल तर सुनेला खूश ठेवावं लागेल.

heart breaking emotional story son force his mother to leave house for his wife | हृदयद्रावक! करोडपती झाल्यानंतर पत्नीसाठी लेकाने आईला काढलं घराबाहेर; मजुरी करुन भरते पोट

फोटो - झी न्यूज

googlenewsNext

रविवार मदर्स डे होता, आईसाठी खास दिवस म्हणून तो दिवस साजरा केला जातो. खरं तर प्रत्येक दिवस आईसाठी असतो. तरीही, ट्रेंडनुसार सर्वच जण त्यादिवशी आईबद्दलचे प्रेम व्यक्त करत आहेत. याच दरम्यान एक संतापजनक घटना समोर आली आहे. करोडपती झाल्यानंतर पत्नीसाठी लेकाने आईला घराबाहेर काढलं. त्यामुळे आता आईवर पोट भरण्यासाठी मजुरी करण्याची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्तौडगडच्या प्रताप नगरमधील रहिवासी कमला देवी यांनी 1987 मध्ये गोवर्धन लाल यांच्याशी लग्न झाल्याचे सांगितले. 

मुलं नसल्यामुळे त्यांनी 11 महिन्यांचा एक मुलगा दत्तक घेतला. त्या मुलाला कमला देवींनी वाढवलं. त्याचं लग्न लावून दिलं. मात्र आता कमला देवीचा मुलगा मोठा माणूस झाला असून त्याच्याकडे 3 ते 4 कोटींची संपत्ती आहे, म्हणून त्याने आपल्या वृद्ध आईला पत्नीसाठी त्रास देण्यास सुरुवात केली. मुलगा बायकोचे कपडे आईकडून धुवून घ्यायचा, बायकोच्या हातापायांना मसाज करायला सांगायचा आणि आईसमोर एक अट ठेवायचा की घरात राहायचे असेल तर सुनेला खूश ठेवावं लागेल.

एवढं करूनही मुलगा समाधानी झाला नाही. त्याने आईचे दागिने, मौल्यवान वस्तू हिसकावून घेऊन तिला घराबाहेर हाकलून दिलं. या संपूर्ण कृत्यात पती गोवर्धन लालचा हात असल्याचा आरोप कमला देवी यांनी केला आहे. मुलगा आणि पतीने बाहेर काढल्यानंतर त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत. वृद्ध महिलेचे म्हणणे आहे की तिला अनेक वेळा बेदम मारहाण करण्यात आली, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. मारहाणीमुळे तिचे हात-पाय नीट काम करत नाहीत.

कमला देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरच्यांकडून होणाऱ्या छळाला सामोरे जावे लागल्यानंतर अनेकवेळा स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन न्यायासाठी याचना केल्या, पण पती आणि मुलाने पैशाच्या जोरावर पोलिसांना विकत घेतले, त्यांचे ऐकले नाही. आता गेल्या 2 वर्षांपासून त्या चित्तौडगडच्या रस्त्यांवर मजूर म्हणून काम करत आहे आणि इतर महिलांच्या मदतीने आपले जीवन जगत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: heart breaking emotional story son force his mother to leave house for his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.