रशियन मुलीला बंगळुरूच्या चिमुकल्याचे हृदय

By admin | Published: December 21, 2014 02:13 AM2014-12-21T02:13:06+5:302014-12-21T02:13:06+5:30

वय केवळ २ वर्षे १० महिने़ जग बघण्याआधीच मेंदुज्वराने या चिमुकल्याचे आयुष्य संपले; पण त्याआधी एका रशियन मुलीला आपले हृदय देऊन हा चिमुकला जीव जणू अमर झाला़

The heart of the young daughter of a Russian girl | रशियन मुलीला बंगळुरूच्या चिमुकल्याचे हृदय

रशियन मुलीला बंगळुरूच्या चिमुकल्याचे हृदय

Next

मेंदुज्वराने हिरावले आयुष्य : हृदयासह विविध अवयवांच्या दानाने ‘तो’ जणू झाला अमर
बंगळुरू/चेन्नई : वय केवळ २ वर्षे १० महिने़ जग बघण्याआधीच मेंदुज्वराने या चिमुकल्याचे आयुष्य संपले; पण त्याआधी एका रशियन मुलीला आपले हृदय देऊन हा चिमुकला जीव जणू अमर झाला़ त्याचे डोळे, किडनी, यकृत आदी अवयवही दान करण्यात आले़
गत गुरुवारी बंगळुरूच्या मणिपाल रुग्णालयात या चिमुकल्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते़ अशा स्थितीत त्याच्या पालकांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला़ त्याचे डोळे (कार्निया) नारायण नेत्रालय, यकृत अपोलो रुग्णालय व किडनी सागर रुग्णालयातील योग्य रुग्णाला दान करण्यात आली. हृदयाचे मॅच न मिळाल्याने चेन्नईत गरजू रुग्णाचा शोध घेतला गेला़ यावेळी चेन्नईच्या फोर्टिस रुग्णालयात एका रशियन मुलीला हृदय प्रत्यारोपणाची गरज असल्याचे लक्षात आले़ हृदयाच्या एका आजारावरील उपचारासाठी महिनाभरापूर्वी तिला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ केवळ हृदय प्रत्यारोपण हाच तिला वाचविण्याचा एकमेव पर्याय होता़ (वृत्तसंस्था)

४ब्रेन डेड चिमुकल्याचे हृदय केवळ ४७ मिनिटात बंगळुरूवरून चेन्नईला पोहोचवले गेले़ शून्य अंशापेक्षा कमी तापमानावर प्रिझर्व्हेशन लिक्विडमध्ये ठेवण्यात आलेले हृदय घेऊन मणिपूर रुग्णालयातून रुग्णवाहिका निघाली़
४या रुग्णवाहिकेने विमानतळापर्यंतचे ३़५ कि. मी. चे अंतर केवळ १ मिनिट २० सेकंदात पूर्ण केले़ यानंतर विमान ३४ मिनिटांत चेन्नईला पोहोचले़ तेथून ११ मिनिटांत रुग्णवाहिकेने हे हृदय फोर्टिस रुग्णालयात पोहोचविण्यात आले़ या ठिकाणी तब्बल आठ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ते संबंधित रशियन मुलीच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले़

Web Title: The heart of the young daughter of a Russian girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.