हृदयद्रावक! आसामच्या जंगलात आभाळ कोसळले; वीज पडून १८ हत्तींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 09:39 AM2021-05-14T09:39:13+5:302021-05-14T09:45:28+5:30
Elephants Died in Assam: वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) अमित सहाय यांनी सांगितले की, कठियाटोली रेंजच्या कुंडोली वन क्षेत्रात एका पहाडावर वीज कोसळून ही दुर्घटना घडली.
18 Elephants Died in Assam Forest: गुवाहाटी : आसामच्या नगाव जिल्ह्यातील जंगलातवीज कोसळून 18 हत्तींचा (Elephant) मृत्यू झाला आहे. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) अमित सहाय यांनी सांगितले की, कठियाटोली रेंजच्या कुंडोली वन क्षेत्रात एका पहाडावर वीज कोसळून ही दुर्घटना घडली. (The preliminary investigation found that 18 Elephants were killed due to electrocution caused by lightning. )
सहाय यांनी सांगितले की, या भागात आमची टीम गुरुवारी दुपारी पोहोचू शकली. दोन झुंडींमध्ये हत्तींचे मृतदेह आढळून आले. यामध्ये 14 हत्तींचे मृतदेह डोंगरावर आढळले तर चार मृतदेह डोंगराच्या खालच्या भागात सापडले.
18 elephants found dead in Assam’s Nagaon
— ANI (@ANI) May 13, 2021
The preliminary investigation found that 18 jumbos were killed due to electrocution caused by lightning. The exact reason will be known only after post- mortem. I will visit the spot tomorrow: Forest Minister Parimal Suklabaidya pic.twitter.com/oXTjs9B2U0
आसामचे वनमंत्री परिमल सुक्लाबैद्या यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात आकाशातील वीज कोसळून 18 हत्तींचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. हत्तींच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमार्टेम नंतरच समजणार आहे. मी आज घटनास्थळाचा दौरा करणार आहे.
सहाय यांनी सांगितले की, बुधवारी रात्री वीज कोसळून हत्तींचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पोस्टमार्टेम केल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समजणार आहे.