ह्रदयद्रावक... कॅनॉलमध्ये कार कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 01:38 PM2023-10-24T13:38:28+5:302023-10-24T13:38:39+5:30

सिकटिया बॅराजमध्ये कार कोसळून हा अपघात झाला. 

Heartbreaking... 5 members of the same family died in a car crash in the canal in devdhar jharkhand | ह्रदयद्रावक... कॅनॉलमध्ये कार कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

ह्रदयद्रावक... कॅनॉलमध्ये कार कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

झारखंडच्या देवघर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी अपघाताची भीषण दुर्घटना घडली. नदीच्या पुलावरुन कार कोसळून एकाच कुटुबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नदीतून कार बाहेर काढली आहे. त्यानंतर, या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

देवघरचे पोलीस अधीक्षक अजीत पीटर डुंगडुंग यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, प्रवास करताना पुलावरुन सिकटिया बॅराजमध्ये कार कोसळून हा अपघात झाला. 

 

वेगात आलेल्या कारने पुलावरुन जाताना रस्त्याच्या कडेला असलेले रोलिंग तोडले. त्यामुळे, बॅराजजवळी कॅनॉलमध्ये कार कोसळली, त्यामध्ये कारमधील ५ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात, एक लहान मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांना बोलावण्यात आले, पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कॅनॉलमधून कार बाहेर काढली, ती बोलेरो गाडी असल्याचे निदर्शनास आले. 

Web Title: Heartbreaking... 5 members of the same family died in a car crash in the canal in devdhar jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.