हृदयद्रावक! भाऊबिजेदिवशी चहा पिताच दोन भावांसह चार जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 07:09 PM2022-10-27T19:09:09+5:302022-10-27T19:10:37+5:30

Four Death In Family: उत्तर प्रदेशमधील मैनपुरीमध्ये भाऊबिजेदिवशीच एका कुटुंबामध्ये शोक पसरला आहे. घरात तयार केलेली चहा पिल्याने कुटुंबातील दोन छोट्या भावांसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला. तसेच ही विषारी दारू प्यायल्याने एका व्यक्तीची प्रकृती गंभीर झालेली आहे.

Heartbreaking! Four people including two brothers died while drinking tea on Bhaubijedivas | हृदयद्रावक! भाऊबिजेदिवशी चहा पिताच दोन भावांसह चार जणांचा मृत्यू 

हृदयद्रावक! भाऊबिजेदिवशी चहा पिताच दोन भावांसह चार जणांचा मृत्यू 

Next

लखनौ - उत्तर प्रदेशमधील मैनपुरीमध्ये भाऊबिजेदिवशीच एका कुटुंबामध्ये शोक पसरला आहे. घरात तयार केलेली चहा पिल्याने कुटुंबातील दोन छोट्या भावांसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला. तसेच ही विषारी दारू प्यायल्याने एका व्यक्तीची प्रकृती गंभीर झालेली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केला.

नगला कन्हईच्या एका घरात तयार केलेल्या चहाने दोन लहान मुलांसह एकूण चार जणांचा बळी घेतला आहे. तर अन्य एकाची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यांना सैफई येथे पाठवण्यात आले आहेत. गाव नगला कन्हईमध्ये शिवनंदन यांच्या घरी सकाळी भाऊबिजेची तयारी सुरू होती. फिरोजाबाद येथील रहिवासी रवींद्र सिंह घरी आले होते.

सर्वजण चहा पिण्यासाठी बसले होते. चहा पिल्यानंतर रवींद्र सिंह यांची प्रकृती अचानक बिघडली. ते बेशुद्ध होऊन खाली पडले. नातेवाईक त्यांना सांभाळत असतानाच शिवनंदन यांचा सहा वर्षांचा मुलगा शिवांग आणि पाच वर्षांचा मुलगा दिव्यांश यांचीही प्रकृती बिघडली. कुटुंबीय तातडीने या तिघांनाही रुग्णालयात नेले.

तिथे डॉक्टरांनी रविंद्र सिंह, शिवांग आणि दिव्यांश यांना मृत घोषित केले. तर शिवनंदन आणि सोबरन सिंह यांची गंभीर प्रकृती विचारात घेऊन त्यांना सैफई येथे हलवण्याची सूचना दिली. मात्र सैफई येथे उपचारांदरम्यान, सोबरन यांचा मृत्यू झाला. दरम्यान, एकाच दिवशी चार जणांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांना शोक अनावर झाला आहे. चहाच्या पावडरऐवजी चुकून कीटकनाशक वापरल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.  

Web Title: Heartbreaking! Four people including two brothers died while drinking tea on Bhaubijedivas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.