हृदयद्रावक! प्रियकराने प्रेमप्रकरणातून मामाच्या मुलीला संपवलं; जखमी आईचा मृत्यूशी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 03:56 PM2023-01-18T15:56:29+5:302023-01-18T15:57:01+5:30

बिहारमधील छपरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Heartbreaking! Lover's brother killed his sister on the spot due to love affair; A wounded mother's struggle with death | हृदयद्रावक! प्रियकराने प्रेमप्रकरणातून मामाच्या मुलीला संपवलं; जखमी आईचा मृत्यूशी संघर्ष

हृदयद्रावक! प्रियकराने प्रेमप्रकरणातून मामाच्या मुलीला संपवलं; जखमी आईचा मृत्यूशी संघर्ष

googlenewsNext

नवी दिल्ली : बिहारमधील छपरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रेमप्रकरणातून मुलीची हत्या करण्यात आली असून मुलीच्या आईवर देखील चाकून हल्ला करण्यात आला. मृत मुलीच्या आईची प्रकृती चिंताजनक आहे. खरं तर आरोपी हा मृत मुलीचा नात्याने भाऊ लागतो. तरीदेखील मुलीचे त्याच्यासोबत प्रेमसंबंध होते,  ज्याला आई अनेकदा विरोध करत असे. यामुळे संतापलेल्या आरोपीने रात्री उशिरा घरात घुसून मुलीचा गळा चिरून खून केला आणि नंतर तिच्या आईलाही चाकूने वार करून जखमी केले. 

दरम्यान, ही घटना मढौरा गौरा ओपीच्या सलीमापूर बाजारातील टोला गावातील आहे. जिथे मंगळवारी रात्री अडीच वाजता आरोपी तरुणाने शेजारच्या घरात घुसून मुलीचा गळा चिरून तिची हत्या केली. त्याचवेळी त्याने मुलीच्या आईवर देखील चाकूने वार करून तिला गंभीर जखमी करून तिथून पळ काढला. आरडाओरडा ऐकून स्थानिक लोकांनी धाव घेतली मात्र, तोपर्यंत आरोपीने पळ काढला होता. घाईघाईत गावकऱ्यांनी मुलीच्या आईला रुग्णालयात नेले.

आईलाही केलं गंभीर जखमी 
गौरा ओपीचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तसेच आरोपी तरुणाच्या अटकेसाठी छापेमारी सुरू करण्यात आली आहे. आरोपी तरुण आणि मृत तरूणी दोघांचे घर बाजूला असून दोघेही भावंडांच्या नात्यात असल्याचे सांगितले जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे मृत मुलगी ही आरोपी तरुणाची नात्याने बहीण आहे. घटनेच्या वेळी तरूणी आणि तिची आई व्यतिरिक्त फक्त तिच्या दोन लहान बहिणी घरात होत्या. तिचे वडील संजय साह हे दुसऱ्या राज्यात राहतात.

आरोपी तरूण फरार 
स्थानिक लोकांनी सांगितले की, आरोपी तरुणाचे त्याच्या मामाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. ज्याला त्याच्या आईने विरोध केला होता. तर काही लोकांनी सांगितले की, किशोरी या मृत तरूणीला तो मुलगा आवडत नव्हता, त्यामुळे दोन्ही कुटुंबात अनेकदा भांडण झाले आहे. मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सध्या तरुणीच्या आईच्या जबानीवरूनच या प्रकरणातील गुपित उलगडणार आहे. याप्रकरणी आरोपी तरुणाचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: Heartbreaking! Lover's brother killed his sister on the spot due to love affair; A wounded mother's struggle with death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.