उष्णतेचा कहर सुरूच बळीसंख्या ७०० वर

By admin | Published: May 26, 2015 11:58 PM2015-05-26T23:58:23+5:302015-05-26T23:58:23+5:30

उष्णतेची लाट कायम असून आंध्र प्रदेशात सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. गत २४ तासांत आंध्रात उष्माघाताचे १४९ बळी गेल्याने देशभरातील बळीसंख्या ७०० वर पोहोचली आहे.

The heat wave prevails over 700 people | उष्णतेचा कहर सुरूच बळीसंख्या ७०० वर

उष्णतेचा कहर सुरूच बळीसंख्या ७०० वर

Next

नवी दिल्ली : उष्णतेची लाट कायम असून आंध्र प्रदेशात सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. गत २४ तासांत आंध्रात उष्माघाताचे १४९ बळी गेल्याने देशभरातील बळीसंख्या ७०० वर पोहोचली आहे.
दिल्लीसह तेलंगण, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा अशा अनेक राज्यांत मंगळवारी ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ओडिशाच्या अंगुल येथे सर्वाधिक ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
महाराष्ट्रात चंद्रपूर आणि वर्धा या दोन ठिकाणी अनुक्रमे ४६.६ आणि ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आंध्र प्रदेशात गत २४ तासांत उष्माघाताचे १४९ बळी गेले. काल सोमवारपर्यंत ही संख्या ३०२ एवढी होती. एकट्या आंध्रात उष्णतेने आत्तापर्यंत ५५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गुंटूर जिल्ह्यात सर्वाधिक १०४ बळी गेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 

Web Title: The heat wave prevails over 700 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.