चिंताजनक! भारतातील 90% लोकांना छळणार उष्णतेची लाट! केंब्रिज विद्यापीठाचा अहवाल; मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 05:27 AM2023-04-21T05:27:43+5:302023-04-21T05:28:12+5:30
Heat wave In India: हवामान बदलामुळे तसेच उसळलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे भारतातील ९० टक्के लोकांना सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न भेडसावतील. तसेच देशात अन्नधान्य टंचाईचे प्रश्न निर्माण होतील.
लंडन : हवामान बदलामुळे तसेच उसळलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे भारतातील ९० टक्के लोकांना सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न भेडसावतील. तसेच देशात अन्नधान्य टंचाईचे प्रश्न निर्माण होतील. या गोष्टींमुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ होण्याची भीती असल्याचे ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाने एका अहवालात म्हटले आहे. पीएलओएस क्लायमेट या नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यासंदर्भात संशोधक रमित देबनाथ यांनी सांगितले की, उष्णतेच्या तीव्र लाटेचा भारताच्या कोणत्या भागावर, तेथील लोकांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास क्लायमेट व्हल्नेरॅबिलिटी इंडिकेटरच्या मदतीने करता येतो.
लोकांचे हाल
ल्ली तसेच आणखी काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचा मोठा परिणाम आढळतो. उकाड्यापासून वाचण्यासाठी अनेकांकडे पंखा, एसी अशा सुविधा असतात. पण ज्यांच्याकडे साध्या पंख्याचीही सुविधा उपलब्ध नाही अशा लोकांचे उन्हाळ्यात विलक्षण हाल होतात.
उष्णतेची लाट वाढणार
गेल्यावर्षी हवामान बदलामुळे उष्णतेची लाट आली होती. त्याचे परिणाम अद्यापही जाणवत आहेत. उष्णतेची लाट नजीकच्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
शाश्वत विकासात पिछाडी
शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या देशांच्या क्रमवारीत गेल्या दोन दशकांत भारताची घसरण झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी निश्चित केलेल्या १७ पैकी ११ उद्दिष्टांची भारताने पूर्तता केलेली नाही, असेही केंब्रिज विद्यापीठाने या अहवालात म्हटले.
३० कोटी भारतीयांच्या आयुष्यावर परिणाम?
n उष्णतेच्या लाटांचा २०५० सालापर्यंत ३० कोटी भारतीयांच्या आयुष्यावर विपरित परिणाम होईल.
n २१०० पर्यंत ६० कोटी भारतीयांच्या जीवनमानाचा दर्जा उष्णतेच्या लाटांच्या तडाख्याने खालावेल, असा अंदाज आहे.