CAA : हिंदू सेनेच्या इशाऱ्यानंतर शाहीन बागमध्ये जमावबंदीचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 11:59 AM2020-03-01T11:59:03+5:302020-03-01T12:13:37+5:30
शाहीन बागेत मोठ्या संख्यने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात शाहीन बागेत गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. शाहीन बाग परिसरात रविवारी (1 मार्च) जमावबंदीचे कलम 144 हे लागू करण्यात आले आहे. दिल्लीपोलिसांनी शाहीन बाग परिसरात कोणीही एकत्र जमू नये, तसेच कोणीही आंदोलन करू नये असं नोटीशीतून बजावले आहे. तसेच हा आदेश न मानल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हिंदू सेनेने ट्विट करून 1 मार्च म्हणजेच रविवारी शाहीन बागेत आंदोलन करणाऱ्यांना हटवण्यात येईल असं म्हटलं होतं. त्यानंतर शाहीन बागेत मोठ्या संख्यने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांनी आपले आंदोलन आता थांबवावे असे आवाहनही पोलिसांनी आंदोलकांना केलं आहे. पोलिसांनी शाहीन बाग परिसराला बॅरिकेड्सनी वेढले आहे. तसेच येथे कलम 144 लागू करण्यात आल्याने आता आंदोलन करण्याची कोणालाही परवानगी नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
Delhi: Heavy police deployment in Shaheen Bagh as a precautionary measure, even after Hindu Sena yesterday called off protest site clearance call pic.twitter.com/5LVwLcaaoO
— ANI (@ANI) March 1, 2020
हिंदू सेनेचे नेते विष्णु गुप्ता यांनी 'दिल्ली पोलीस शाहीन बागेत सीएए विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत' असं ट्विट केलं आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 14, 19 आणि 21 अंतर्गत तेथे सर्वसामान्य लोकांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हिंदू सेना 1 मार्च 2020 या दिवशी सकाळी 10 वाजता सर्व राष्ट्रवादींना अडवण्यात आलेल्या रस्ते मोकळे करण्यासाठी आमंत्रित करत आहे असंही हिंदू सेनेने जाहीर केलं होतं.
दिल्लीतील हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराचा वणवा शमला असला तरी तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला असून 250 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी
China Coronavirus : 'कोरोना'चा कहर! जगातील 500 श्रीमंत व्यक्तींचे 444 अब्ज डॉलरचे नुकसान
संतापजनक! मुलाशी फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांची भरचौकात मुलीला मारहाण, दिली भयंकर शिक्षा
"अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासाठी घटना सार्वजनिक दृष्टिपथात होणे आवश्यक"
दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार पैसे