Heavy Rainfall Alert: महाराष्ट्र-गोव्यासह अनेक राज्यात मुसळधार, पुढील 5 दिवस महत्वाचे; IMD ने जारी केला अलर्ट
By ओमकार संकपाळ | Published: July 8, 2022 05:09 PM2022-07-08T17:09:46+5:302022-07-08T17:16:23+5:30
Heavy Rainfall Alert: भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि गोव्यासह इतर अनेक राज्यांमध्ये येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
नवी दिल्ली: भारतीय हवामान खात्याने येत्या पाच दिवसांत मुंबई आणि गोव्यासह इतर अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD ने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये शनिवार-रविवार मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
IMD predicts heavy rains in Punjab, Haryana, Chandigarh
— ANI Digital (@ani_digital) July 8, 2022
Read @ANI Story | https://t.co/vjN0YBWG1B#IMD#rain#Punjab#Haryana#Chandigarh#Monsoonpic.twitter.com/BtJfwlc1My
महाराष्ट्रात रेड अलर्ट
महाराष्ट्रात सलग 4 दिवसांपासून पाऊस पडत आहे. IMD ने आता मुंबई आणि गोव्यात पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गुजरातेत मुसळधार
IMD च्या अलर्टनुसार गुजरातमध्ये 11 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये नवसारी, वलसाड, दमण, दादर नगर हवेली, सौराष्ट्र आणि कच्छमधील जामनगर, जुनागढ, देवभूमी द्वारका आणि दक्षिण गुजरातमधील कच्छ जिल्ह्यांचा समावेश आहे, जेथे मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. मात्र, गुजरातमधील काही भागात आधीच पाऊस सुरू आहे. जुनागडच्या पावसानंतर पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.