गोव्यात पाचव्या दिवशीही जोरदार पाऊस
By Admin | Published: July 21, 2016 09:35 PM2016-07-21T21:35:38+5:302016-07-21T21:35:38+5:30
गोव्यात सलग पाचवा दिवसही पावसानेच गाजविल्यामुळे राज्यभर पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यात आतापर्यंत पडलेला पाऊस ७५ इंचपेक्षा वर गेला आहे. आणखी ४ दिवस
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 21 - गोव्यात सलग पाचवा दिवसही पावसानेच गाजविल्यामुळे राज्यभर पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यात आतापर्यंत पडलेला पाऊस ७५ इंचपेक्षा वर गेला आहे. आणखी ४ दिवस असाज पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गुरूवारी गोव्यात सरासरी अडीच इंचाहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे एकूण पावसाने इंचाची पंचाहत्तरी ओलांढली आहे. मुरगाव सारख्या ठिकाणी तो ९२ इंचावर पोहोचला आहे. मुरगाव व दाबोळी येथे चोवीस तासात सर्वाधिक म्हणजे ४ इंच पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर काणकोण व पेडणेचा क्रमांक आहे.
भल्या पहाटे सुरू झालेला पाऊस पूर्णपणे थांबला असे दिवसभरात कधी दिसलेच नाही. कधी जोरदार तर कधी हलकी रिमझीम चालूच होती. आकाश पूर्णपणे झाकलेले होते. पावसाला वाऱ्याची साथ नसल्यामुळे गेल्या चार दिवसात आकाश मोकळे दिसलेच नाही. येत्या चार दिवसात ही परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पाऊसही तसाच चालू राहणार आहे.