मध्य महाराष्ट्र, कोकण, गोव्यात 'पर्जन्य राज' ; रायगड, पालघरला अतिवृष्टीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 09:21 PM2020-06-15T21:21:53+5:302020-06-15T21:30:43+5:30
मॉन्सूनने गुजरातमधील कांडला, अहमदाबाद, नरसिंगपूर, उमारिया,बालियापर्यंत मारली मजल..
पुणे : नैऋत्य मोसमी पावसाने आज उत्तर अरबी समुद्र, गुजरात राज्याच्या काही भागात, दिवचा संपूर्ण भागात, मध्य प्रदेशचा आणखी काही भाग, छत्तीसगड, झारखंड व बिहारच्या उर्वरित भागात, पूर्व उत्तर प्रदेशाच्या काही भागात वाटचाल केली. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात व विदर्भात बर्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून पालघर जिल्ह्यात बुधवारी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मॉन्सूनने गुजरातमधील कांडला, अहमदाबाद, नरसिंगपूर, उमारिया,बालियापर्यंत मजल मारली आहे.
गेल्या २४ तासात राज्यात कणकवळी ८०, पालघर ७०, लांजा, माणगाव ६०, सावंतवाडी, वालपोई ५०, मोखेडा, मुरुड, केप, रत्नागिरी ४०, कानकोना,चिपळूण, डहाणु, खेड, महाड, मुंबई (कुलाबा), पेडणे, फोंडा, राजापूर,संगमेश्वर, देवरुख, वैभववाडी ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. मध्यमहाराष्ट्रातील गगनबावडा, महाबळेश्वर ५०, पाथर्डी ४०, आजारा, खटाव, वडुज,पन्हाळा, यवल ३०, पुरंदर, सासवड, राधानगरी, शाहूवाडी, वेल्हे येथे २०मिमी पाऊस झाला.
मराठवाड्यात धर्मबाद, परभणी, सेनगाव ३०, जळकोट, लातूर, पालम २० मिमी पाऊस पडला. विदर्भातील चंद्रपूर ६०, नागपूर, सेलू ४०, बल्लारपूर, भद्रावती,चिखलदरा, कळंब, मोर्शी ३०, चांदूर बाजार, चिमूर, देवळी, दिग्रस,हिंगणघाट, मालेगाव, मंगलूरपीर, नेर, वरोरा, वाशिम येथे २० मिमी पावसाचीनोंद झाली होती. घाटमाथ्यावर कोयना (पोफळी) ३०, शिरगाव दावडी, कोयना(नवजा), ताम्हिणी २० मिमी पाऊस झाला.
...........................
इशारा :
१६ जून रोजी कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाततुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. १७ जून रोजी कोकण,गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
........
रायगड जिल्ह्यात १६ जूनला तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यात १६ जूनला जोरदार पावसाची शक्यता आहे. सातारा, बीड आणि लातूरला मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ जूनपर्यंत सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात १७ जूनला अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.