मुसळधार पाऊस, उष्मा, वादळे आदी संकटांमुळे देशात दररोज सरासरी आठ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 08:17 AM2021-09-13T08:17:54+5:302021-09-13T08:18:56+5:30

हवामान खात्याचा अहवाल; अकरा वर्षांतील आकडेवारी

heavy rains heat waves storms kill an average of eight people every day in the country pdc | मुसळधार पाऊस, उष्मा, वादळे आदी संकटांमुळे देशात दररोज सरासरी आठ जणांचा मृत्यू

मुसळधार पाऊस, उष्मा, वादळे आदी संकटांमुळे देशात दररोज सरासरी आठ जणांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : देशामध्ये पडणारा मुसळधार पाऊस, वीज कोसळणे, वादळे, थंडीची लाट, वाढता उष्मा, धुळीची वादळे आदी घटनांमुळे २०१० ते २०२१ या अकरा वर्षांमध्ये दररोज सरासरी आठ जणांचा मृत्यू होत आहे. यासंदर्भातील आकडेवारी हवामान खात्याने गोळा केली आहे. 

हवामानाशी निगडित विविध आपत्तींमुळे गेल्या ११ वर्षांत देशात ३२,०४३ लोकांचा मृत्यू झाला. त्याची सरासरी काढल्यास दर दिवशी आठ लोकांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयानेही हवामान बदलाविषयी एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, विसाव्या शतकात मध्य भारतातील तापमानात वाढ व पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. तसेच काही ठिकाणी अवर्षणाची स्थिती निर्माण झाली. समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की, १९०१ ते २०१८ या कालावधीत भारताच्या सरासरी तापमानात ०.७ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. १९८६ ते २०१५ या ३१ वर्षांच्या कालावधीत सर्वात उष्ण दिवस व सर्वात कडाक्याच्या थंडीची रात्र यांच्या तापमानात अनुक्रमे ०.६३ अंश सेेल्सिअस व ०.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

गंगा, सिंधू खोऱ्यात उष्मा

तापमान व आर्द्रता यांच्यात झालेल्या वाढीमुळे गंगा व सिंधू नदीच्या खोऱ्यात उष्मा वाढण्याची शक्यता आहे. १९५१ ते २०१५ या कालावधीत हिंद महासागराच्या तापमानात १ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

- १३,३०३ जणांचा २०१० ते २०२१ या कालावधीत मध्य भारतात मुसळधार पावसामुळे झाला. 

- ६.४९५ उष्माघाताने मृत्यू, २,४८९ थंडीने मृत्यू, ३,८३२ वादळामुळे मृत्यू, ८९५ जणांचा मृत्यू चक्रीवादळामुळे, ४४६ धुळीच्या वादळांमुळे जणांना जीव गमवावा लागला. ३४५ तुफान हिमवृष्टीमुळे  जणांचा मृत्यू झाला.
 

Web Title: heavy rains heat waves storms kill an average of eight people every day in the country pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.