महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड अन् हिमाचलमध्ये जोरदार पाऊस; कुठे काय परिस्थिती, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 10:02 AM2023-07-28T10:02:01+5:302023-07-28T10:02:11+5:30

Rain Updates: जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यातील बिल्लावरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Heavy rains in Maharashtra, Gujarat, Uttarakhand and Himachal; Find out where the situation is! | महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड अन् हिमाचलमध्ये जोरदार पाऊस; कुठे काय परिस्थिती, जाणून घ्या!

महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड अन् हिमाचलमध्ये जोरदार पाऊस; कुठे काय परिस्थिती, जाणून घ्या!

googlenewsNext

नवी दिल्ली: देशाच्या अनेक भागात कालही पावसाने कहर केला. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. जम्मू-काश्मीर विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये नाल्यांना उधाण आले आहे. रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेकडो गावांचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे डझनभर रस्ते बंद झाले असून शेकडो लोक अडकले आहेत.

जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यातील बिल्लावरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील ओल्या नाल्यात अचानक पाणी आल्याने पुलाचा अप्रोच रोड वाहून गेला. जनसंपर्क विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. रस्ता वाहून गेल्याने बिल्लावरचा अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. तिकडे पठाणकोटला राष्ट्रीय महामार्ग ४४ने जोडणाऱ्या सन्याल पुलाला दरड कोसळली आहे. अपघाताची शक्यता असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलावरून वाहने ये-जा करू शकत नसल्यामुळे या भागाचा पंजाबशी संपर्क तुटला आहे.

काश्मीर विभागात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. नदी-नालेही धोक्याच्या चिन्हावर वाहत आहेत. कुपवाडा येथील ढगफुटीमुळे लोलाब भागातील खुमरियाल पुलाचे नुकसान झाले. त्यामुळे परिसरातील काही भागांचा संपर्क तुटला आहे. धुक्यामुळे गुरुवारी कटरा येथे वैष्णोदेवीसाठी हेलिकॉप्टर सेवा धावू शकली नाही.

हरियाणातील नद्यांची पाणी पातळी होतेय कमी

डोंगरावर पाऊस थांबल्याने नद्यांची पाणीपातळी थांबू लागली आहे. जीटी बेल्टमधील यमुना, टांगरी आणि मार्कंडा नद्या शांत झाल्या आहेत. फतेहाबाद आणि सिरसा जिल्ह्यात घग्गर नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. असे असतानाही अनेक भागात परिस्थिती सामान्य नसल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी सिरसा जिल्ह्यातील घग्गर नदीची पाणीपातळी ५८ हजारांवरून २६ हजार क्युसेकवर घसरली आहे.

रायगड दुर्घटनेनंतर ७ हजार लोकांना छावण्यांमध्ये पाठवले-

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर, दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे १०३ गावांतील सुमारे ७००० लोकांना रायगडमधील ५१ छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. १९ जुलै रोजी झालेल्या इर्शाळवाडी दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५७ अजूनही बेपत्ता आहेत. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

आजही मुसळधार पावसाचा इशारा-

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाले तुंबले आहेत. बियास, सतलुत आणि रावी नद्याही आपले उग्र रूप दाखवत आहेत. शुक्रवारी राज्यातील नऊ जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने ऑरेंज जारी केला आहे. दरम्यान, भूस्खलनामुळे किन्नौर आणि स्पिती खोऱ्याचा शिमल्यापासून संपर्क तुटला आहे. दुसरीकडे, पालीगड येथे मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने अडथळा ठरलेला उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्ग आता खुला झाला आहे. गुरुवारी उत्तराखंडमधील बहुतांश भागात हवामान स्वच्छ होते. गुम्माजवळील मंडी-पठाणकोट एनएच बुधवारी रात्री तीन तास बंद राहिल्याने सकाळपर्यंत सर्व वाहने तेथे अडकून पडली होती. 

Web Title: Heavy rains in Maharashtra, Gujarat, Uttarakhand and Himachal; Find out where the situation is!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.