यमुनेचा पूर ओसरला नाही तोवर दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु; परिस्थिती बिघडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 08:40 PM2023-07-15T20:40:05+5:302023-07-15T20:40:15+5:30

दिल्ली आणि एनसीआरमध्ये अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे. दिल्लीच्या द्वारका, जनकपुरी, सागरपूर भागात पाऊस झाला आहे.

Heavy rains started in Delhi when the flood of Yamuna did not recede; The situation will worsen | यमुनेचा पूर ओसरला नाही तोवर दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु; परिस्थिती बिघडणार

यमुनेचा पूर ओसरला नाही तोवर दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु; परिस्थिती बिघडणार

googlenewsNext

देशाची राजधानी दिल्ली गेल्या काही दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकली होती. दिल्लीला सुमारे ४५ वर्षांनी पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. हे पाणी कालपासून ओसरायला सुरुवात झाली होती. काही चिखलमय रस्ते पुन्हा दिसू लागले होते. असे असताना आज शनिवारी दुपारनंतर दिल्लीला पावसाने झोडायला सुरुवात केल्याने परिस्थिती बिघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

दिल्ली आणि एनसीआरमध्ये अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे. दिल्लीच्या द्वारका, जनकपुरी, सागरपूर भागात पाऊस झाला आहे. तर नोएडा, फरीदाबाद आणि गाझियाबादमध्ये देखील शुक्रवारी रात्रीपासून थांबून थांबून पाऊस पडत आहे. एनसीआरच्या बहुतांशा भागात सायंकाळी जोरदार पाऊस कोसळला आहे. हे दिल्लीकरांसाठी चांगले संकेत नाहीएत. असाच पाऊस पडत राहिला तर दिल्लीत पुन्हा पुराची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. 

दिल्लीच्या आयटीओ, राजघाट, आयएसबीटी आणि मथुरा रोडसह काही भागात अजूनही पाणी तुंबले आहे. दिल्लीतील पूर आटोक्यात आणण्यासाठी लष्कर, एनडीआरएफ, दिल्ली पोलिस आणि दिल्ली अग्निशमन दलाच्या पथके रस्त्यावर उतरली आहेत. आधीच पूरस्थिती असलेल्या दिल्लीला पावसाचा अतिरिक्त भार सहन होणार नाही अशी स्थिती आहे. 

लोकांच्या घरात चिखल आला आहे. रस्ते चिखलाने माखलेले आहेत. ते स्वच्छ करावे लागणार आहे. हे काम केल्यानंतर पुन्हा पूर आला तर अशी भीती नागरिकांसह प्रशासनाला वाटत आहे. 

Web Title: Heavy rains started in Delhi when the flood of Yamuna did not recede; The situation will worsen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.