भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

By कुणाल गवाणकर | Published: November 14, 2020 07:56 AM2020-11-14T07:56:20+5:302020-11-14T07:58:32+5:30

भारतीय राजदूतांना पाकिस्तानकडून समन्स; परराष्ट्रमंत्री आज माध्यमांशी संवाद साधणार

heavy shellings from pakistan indian army high alert on loc | भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

googlenewsNext

श्रीनगर: दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा ओलांडता यावी यासाठी सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानी सैन्याचे ११ सैनिक भारताच्या प्रत्युत्तरात मारले गेले. तर १६ सैनिक जखमी झाले. भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान हादरला आहे. पाकिस्ताननं भारतीय राजदूतांना समन्स बजावलं आहे. पाकिस्तानचे डीजी आणि परराष्ट्र मंत्री एम. एम. कुरेशी आज माध्यमांशी संवाद साधणार आहेत. 

Video! बीएसएफने खटका ओढला! प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 7 सैनिक ठार; एलओसीपार मोठे नुकसान

दिवाळीच्या पूर्वसंध्येला एलओसीच्या मार्गानं दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानी सैन्यानं सीमावर्ती भागांमध्ये जोरदार गोळीबार केला. यामध्ये भारताचे ५ जवान शहीद झाले. यामध्ये लष्कराच्या चार, तर सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचा समावेश आहे.  पाकिस्तानच्या गोळीबारात ६ नागरिकांचाही मृत्यू झाला. 

कोल्हापूर दिवाळीच्या दिवशीच शोकमग्न; पाकिस्तानच्या गोळीबारात बहिरेवाडीचा जवान शहीद

पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. केरन, पुंछ आणि उरीमध्ये गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉन्च पॅड भारतानं उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईनं पाकिस्तान बिथरला आहे. भारताच्या राजदूतांना पाकिस्तान सरकारनं समन्स बजावलं आहे. याशिवाय काल रात्रभर सीमावर्ती भागात बेछूट गोळीबार सुरू आहे.

दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी या आठवड्यात पाकिस्तान सैन्यानं दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. याआधी ७-८ नोव्हेंबरलादेखील पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. या दरम्यान तीन दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या तिन्ही दहशतवाद्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला.

Web Title: heavy shellings from pakistan indian army high alert on loc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.