उत्तरेत जोरदार बर्फवृष्टी, राजस्थानमध्ये गारपिटीमुळे पिके उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 05:57 AM2023-01-31T05:57:34+5:302023-01-31T05:58:02+5:30

snowfall : उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी रात्री जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काश्मीर आणि हिमाचल मध्ये बर्फवृष्टीमुळे महामार्ग बंद करण्यात आले आहेत.

Heavy snowfall in north, crops destroyed due to hailstorm in Rajasthan | उत्तरेत जोरदार बर्फवृष्टी, राजस्थानमध्ये गारपिटीमुळे पिके उद्ध्वस्त

उत्तरेत जोरदार बर्फवृष्टी, राजस्थानमध्ये गारपिटीमुळे पिके उद्ध्वस्त

googlenewsNext

नवी दिल्ली : उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी रात्री जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काश्मीर आणि हिमाचल मध्ये बर्फवृष्टीमुळे महामार्ग बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी या बर्फवृष्टीचा फायदा पर्यटकांनी उचलत आनंद लुटला. राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांची नासाडी झाली आहे.
रविवारी झालेल्या पावसामुळे सोमवारी सकाळपासूनच दिल्लीत थंडगार वारे वाहत होते. किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या २४ तासांत हवेची गुणवत्ता सुधारली आहे.

Web Title: Heavy snowfall in north, crops destroyed due to hailstorm in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.