कोल्हेर येथे तिव्र पाणीटंचाई
By admin | Published: May 22, 2016 07:39 PM2016-05-22T19:39:31+5:302016-05-23T00:12:41+5:30
पांडाणे : दिडोरी तालुक्यातील कोल्हेर येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडून टॅँकरसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र टॅँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेता टॅँकर त्वरीत सुरू करण्याची मागणी होत आहे.

पाणीटंचाईवर उपयायोजना
पांडाणे : तालुक्यातील अंबानेर येथे ग्रामपंचायतीने पाणीटंचाईवर उपाययोजना केल्या आहेत. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी चौकाचौकात नळ काढून दिले आहेत. पाणीपुरवठा करणार्या मुख्य पाईप लाईनव्दारे प्रत्येक चौकाचौकात पाणी उपलब्ध झाल्याने पाणी टंचाईची समस्या सुटली आहे.
नालेसफाईची मागणी
येवला : पावसाळ्या पुर्वी शहरातील गटारी व नाल्याची सफाई व्हावी,अशी अपेक्षा नागरीकाकडून व्यक्त होत आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी असलेल्या गटारीमध्ये पावसाचे पाणी जाऊन घाण रस्त्यावर येते. त्यामुळे त्वरीत स्वच्छता मोहिम नगरपालिकेने हाती घेण्याची गरज आहे.
येवलेकरांना कुपनलिकेचा आधार
येवला : येवला शहरात सध्या दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे टंचाईचा सामना नागरीकांना करावा लागत आहे. त्यासाठी नागरीकांनी कुपनलिकेचा पाण्यासाठी आधार घेतला आहे. वापरण्यासाठी लागणारे पाणी बोअरवेल, कुपनलिकेवरून नागरीक आणत आहेत.
कांदा साठवणूकीसाठी धावपळ
येवला : कांद्यांचे दर घसरल्याने शेतकर्यांनी कांदा साठवणूकीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग शेतात कांदा साठवणूकीच्या कामात व्यस्त दिसून येत आहे. कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.