उंची लहान, पण आत्मविश्वास दांडगा होता; हे लेफ्टनंट ठरणार प्रेरणादायी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:02 AM2020-06-17T11:02:48+5:302020-06-17T11:04:52+5:30
भारतीय सैन्यामध्ये दाखल होण्यासाठी अधिकाऱ्याची उंची कमीत कमी 157 सेमी असायला हवी. मात्र, पूर्वोत्तर, आसाम, गोरखा आणि आदिवासींसाठी यामध्ये काहीशी सूट दिलेली आहे. या श्रेणीसाठी कमीतकमी उंची 152 सेमी आहे.
देशभरातील अनेक तरुण सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहत असतात. पण प्रत्येकाचे स्वप्न प्रत्यक्षात येत नाही. देशसेवेत रुजू होणारे लोक खूप भाग्यवान असतात असे म्हटले जाते. काही जणांना उंची कमी पडते. काही जणांची छाती, असे अनेक त्रूटी काढून त्यातून सुटलेला तरुण अखेर देशसेवेत घेतला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा एका लेफ्टनंटची कहानी सांगणार आहोत. ज्याची उंची खूप कमी आहे.
नुकतीच भारतीय सैन्य अकादमीची (आयएमए) पासिंग आऊट परेड झाली. यामध्ये अनेक तरुण भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या रेजिमेंटचे अधिकारी बनले. असेच एक नाव आहे. लेफ्टनंट लल्ह्माच्चुआना. या लल्ह्माच्चुआना यांची उंची खूपच कमी आहे. मात्र , त्यांच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला होता.
मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी त्यांची स्तुती करत ट्विट लिहिले आहे. यानंतर या लल्ह्माच्चुआना यांची कहानी लोकांना प्रेरित करत आहे. जोरामथांगा यांनी 14 जूनला हा फोटो शेअर केला होता. यावर त्यांनी मिझोरामला Lt. Lalhmachhuana यांचा अभिमान आहे. ते उत्री रामहलूनचे राहणारे आहेत. लल्ह्माच्चुआना यांना प्रतिष्ठेच्या भारतीय शस्त्रास्त्र रेजिमेंटमध्ये अधिकारी बनविण्यात आले आहे.
पहिल्या फोटोमध्ये Lt. Lalhmachhuana एकटेच आहेत. पण दुसऱ्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत अन्य दोघे सहकारी अधिकारी आहेत. ते दोघोही उंच आहेत यामुळे लल्ह्माच्चुआना यांची उंची स्पष्ट दिसत आहे. हे दृष्य भारतीय सैन्यामध्ये खूपच दुर्मिळ आहे. यामुळे ते अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरण्याची शक्यता आहे.
Mizoram is proud of our very own Lt. Lalhmachhuana
— Zoramthanga (@ZoramthangaCM) June 14, 2020
s/o Lalsangvela from Ramhlun 'N' who was recently commissioned as an officer in the reputed Indian Army under the famed Artillery Regiment.#PassingOutParade#IndianArmy#ArtilleryRegiment#MizoramforIndiapic.twitter.com/puwtncPbtl
लल्ह्माच्चुआना यांची उंची किती असेल याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, ते एसटी श्रेणीमध्ये येतात. भारतीय सैन्यामध्ये दाखल होण्यासाठी अधिकाऱ्याची उंची कमीत कमी 157 सेमी असायला हवी. मात्र, पूर्वोत्तर, आसाम, गोरखा आणि आदिवासींसाठी यामध्ये काहीशी सूट दिलेली आहे. या श्रेणीसाठी कमीतकमी उंची 152 सेमी आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
India China Face Off: भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता
India China Face Off: भारतीय सैन्य घमेंडी; मोठ्या युद्धासाठी तयार; चीनची युद्धखोरीची भाषा
India China Face Off: खंजीर खुपसला! चीनचा मागे हटण्याचा दिखावा; भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला
India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप
Galwan Valley 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद