हल आणि हातामुळे मोदी सरकार झुकले

By admin | Published: September 21, 2015 01:50 AM2015-09-21T01:50:19+5:302015-09-21T01:50:19+5:30

‘जब हल और हाथ की ताकत साथ आयी तो मोदी सरकार को भूमी अध्यादेश वापस लेकर इस ताकत के आगे झुकना पडा। यह किसी व्यक्ती की नही आप की जीत है।

Held and handheld Modi government tilted | हल आणि हातामुळे मोदी सरकार झुकले

हल आणि हातामुळे मोदी सरकार झुकले

Next

नवी दिल्ली : ‘जब हल और हाथ की ताकत साथ आयी तो मोदी सरकार को भूमी अध्यादेश वापस लेकर इस ताकत के आगे झुकना पडा। यह किसी व्यक्ती की नही आप की जीत है। देशका किसान केवल अन्नदाता ही नही भाग्यविधाता भी है।’ सोनिया गांधींच्या मुखातून हे उद्गार ऐकताच दिल्लीच्या रामलीला मैदानावर जणू चैतन्याची लहर उसळली.
श्रोत्यांना मधेच थांबवीत सोनिया म्हणाल्या, ही लढाई अजून संपलेली नाही, आता ती राज्या-राज्यांत पोहोचली आहे. काँग्रेस दिल्लीत कायदा मंजूर होऊ देणार नाही, याचा अंदाज आल्यावर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना हा कायदा करण्यासाठी त्यांनी भरीस घातले आहे.

नवी दिल्ली : ‘जब हल और हाथ की ताकत साथ आयी तो मोदी सरकार को भूमी अध्यादेश वापस लेकर इस ताकत के आगे झुकना पडा। यह किसी व्यक्ती की नहीं आप की जीत हंै। देशका किसान केवल अन्नदाता ही नहीं, भाग्यविधाता भी हैं।’
सोनिया गांधींच्या मुखातून हे उद्गार ऐकताच दिल्लीच्या रामलीला मैदानावर जणू चैतन्याची लहर उसळली. श्रोत्यांना मधेच थांबवीत सोनिया म्हणाल्या, की ही लढाई अजून संपलेली नाही़ आता ती राज्याराज्यात पोहोचली आहे. काँग्रेस दिल्लीत कायदा मंजूर होऊ देणार नाही, याचा अंदाज आल्यावर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना हा कायदा करण्यासाठी त्यांनी भरीस घातले आहे.
भूसंपादन विधेयकाच्या विरोधात दिल्लीत लढाई जिंकल्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे रविवारी रामलीला मैदानावर ‘विजय रॅली’चे आयोजन करण्यात आले होते, सोनिया त्या रॅलीला संबोधित होत्या.
१९ एप्रिल रोजी याच मैदानावर काँग्रेसने भूसंपादन विधेयकाच्या विरोधात महारॅलीचे आयोजन केले होते. त्याचा उत्तरार्ध आजच्या विजयोत्सव रॅलीने संपन्न झाला. त्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वादग्रस्त भूसंपादनाच्या मुद्द्यावर संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. काँग्रेस विकासाच्या मार्गात खोडा आणत आहे, हा पंतप्रधानांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.
सोनिया म्हणाल्या, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशभर शेतकरी दुरवस्थेत आहे. पावसाने काही भागांत यंदा ओढ दिली तर कुठे अतिवृष्टी झाली. कुठे दुष्काळ तर कुठे महापूर अशा संकटाच्या वेळी पंतप्रधानांकडे परदेश वाऱ्यांसाठी आणि उद्योगपतींना भेटण्यासाठी वेळ आहे; मात्र शेतकऱ्यांसाठी नाही. देशातल्या तरुणांना हेच मोदी मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळवून देणार होते. त्याचे काय झाले? आता त्या विषयावर ते बोलतही नाहीत आणि कोणाचे ऐकतही नाहीत.
आमच्यावर आरोप केला जातो की संसदेच्या कामकाजात आम्ही अडथळे निर्माण करतो. होय, जनतेचा आवाज जर हे सरकार ऐकणारच नसेल तर यापुढेही हाच प्रयोग आम्ही वारंवार करू. एक गोष्ट लक्षात घ्या, विकासाच्या विरोधात काँग्रेस पक्ष कधीच नव्हता.
स्वातंत्र्यलढ्यात ज्या पक्षाने अनेक बलिदाने दिली, आधुनिक भारताची ज्याने निर्मिती केली तो पक्ष विकासाच्या विरोधात कसा असेल? राष्ट्रहितासाठी आम्ही वाटेल तो त्याग करायला तयार आहोत. केवळ आपले वैफल्य लपविण्यासाठी पंतप्रधान आमच्यावर असले आरोप करीत आहेत.
वादग्रस्त भूसंपादन विधेयकाविरुद्धची पहिली लढाई जिंकल्यानंतर काँग्रेसने रविवारी मोदी सरकारविरोधात दुसऱ्या लढाईचे रणशिंग फुंकत भूसंपादनाविरोधातील लढा राज्याराज्यांत नेण्याची घोषणा केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ची खिल्ली उडवीत पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, ‘मेक’चा अर्थ निर्माण करणे आणि ‘टेक’चा अर्थ काढून घेणे. ‘मेक इन इंडिया’ची घोषणा करणाऱ्या सरकारचा प्रत्यक्षात ‘टेक इन इंडिया’वर अधिक भरोसा आहे. या योजनेसाठीच तुमची जमीन ते काढून घेणार होते. काँग्रेसच्या ४४ खासदारांनी संसदेत तीव्र लढा देत त्यांचा हा डाव रोखला.

मोदींच्या दरबारात शेतकऱ्यांना स्थान नाही. आपली व्यथा माझ्याकडे बोलून दाखवताना एक शेतकरी म्हणाला, शेतकऱ्याला दोन माता असतात, पहिली जी माझी घरात काळजी घेते आणि दुसरी आई म्हणजे आमची जमीन. जिथे काबाडकष्ट करून देशासाठी आम्ही धान्य पिकवतो. मोदी सरकार आमच्या आईलाच आमच्यापासून हिरावून घ्यायला निघाले आहे.

शेतकरी कमजोर झाला तर मोदींना ते हवेच आहे. काही राज्यांत ऊ स उत्पादक आता संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. रोज नवी परिधाने नेसणाऱ्या मोदींना शेतकऱ्यांच्या या व्यथा कशा कळणार? नवनव्या पेहरावात कधी १५ लाखांचा सूटही त्यांच्या अंगावर असतो. अशा सूट-बूटवाल्यांचा दरबारच अवतीभवती त्यांनी भरवला आहे. त्यांचेच ते ऐकतात. सामान्य माणसाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी संघर्षच करावा लागणार आहे.

काँग्रेसच्या किसान सन्मान रॅलीत दिल्ली व आसपासच्या राज्यांतले लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हरयाणातले लोक त्यात उठून दिसत होते. शक्तिप्रदर्शनासाठी माजी मुख्यमंत्री हुड्डा व अशोक तंवर या दोन नेत्यांचे समर्थक गुलाबी व लाल रंगाचे फेटे चढवून आले होते. रॅली सुरू होण्यापूर्वी या दोन गटांतल्या काही समर्थकांमधे बाचाबाची झाली. व्यासपीठावरून सूचना देऊन अखेर हा व्यत्यय थांबवावा लागला.

Web Title: Held and handheld Modi government tilted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.