दुश्मनाच्या रणगाड्याला हवेतून मार्ग काढत भेदू शकणार 'हेलिना'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 03:05 PM2018-08-20T15:05:41+5:302018-08-20T15:42:22+5:30
डीआरडीओने विकसित केले; नुकतीच पोखरणमध्ये यशस्वी चाचणी
जैसलमेर : दुश्मनांच्या रणगाड्यांना आकाशातून भेदू शकणारे मिसाईल भारताने बनविले आहे. या मिसाईलला उपग्रहांद्वारे त्याच्या लक्ष्याचा मार्ग दाखविता येणार आहे. या मिसाईलचे नाव आहे 'हेलिना'. याचे नुकतेच यशस्वी परिक्षण करण्यात आले.
'हेलिना' हे एक गायडेड सिस्टिमवर चालणारे मिसाईल आहे. हवाई दलाने नुकतेच या स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन (SAAW) ची चाचपणी केली. त्याने दोन प्रकारच्या वातावरणात जमिनीवरील लक्ष्यांना अचूक भेदले आहे. राजस्थानच्या पोखरणमध्ये या मिसाईलचे परिक्षण करण्यात आले. महत्वाचे म्हणजे भारताने पहिल्या अणुबॉम्बची चाचणी याच ठिकाणी घेतली होती.
'हेलिना' या मिसाईलमध्ये SAAW ही युद्ध सामुग्री व तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'हेलिना' हे मिसाईल दिशादर्शक प्रणालीचा वापर करून आपले लक्ष्य अचूक भेदते. हे मिसाईल जगातील रणगाडा विरोधी ह्त्यारांपैकी एक आहे.
हेलिना आणि SAAW या दोघांनाही डीआरडीओने विकसित केले आहे. यावेळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले.
हेलिनाची वैशिष्टे :
- नाग या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाइलचे हेलिकॉप्टरमध्ये वापरता येणारे व्हर्जन
- 7 ते 8 किमीवरील लक्ष्याला अचूक भेदण्याची क्षमता
- एचएएल ध्रुव और एचएएल लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरमध्ये वापरू शकणार