Helicopter Crash: विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांचं पार्थिव नेण्यासाठी अवघ्या अडीच तासात बनवला पक्का रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 01:41 PM2021-12-11T13:41:24+5:302021-12-11T13:42:29+5:30

Bipin Rawat Helicopter Accident: विशेष म्हणजे १२ वर्षापूर्वी ही गल्ली बनवण्यात आली होती मात्र आज याठिकाणी डांबर टाकण्यात आले आहे.

Helicopter Crash: Wing commander prithvi singh funeral road built in two and half hours in agra | Helicopter Crash: विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांचं पार्थिव नेण्यासाठी अवघ्या अडीच तासात बनवला पक्का रस्ता

Helicopter Crash: विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांचं पार्थिव नेण्यासाठी अवघ्या अडीच तासात बनवला पक्का रस्ता

Next

आग्रा – तामिळनाडूच्या कुन्नूर येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत(Bipin Rawat) यांच्यासह १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात आग्रा येथील विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांनाही जीव गमवावा लागला. आता पृथ्वी सिंह चौहान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु आहे. पृथ्वी सिंह चौहान यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता अतिशय बिकट अवस्थेत होता. त्याठिकाणी अंत्ययात्रा निघणंही कठीण होतं. त्यामुळे अवघ्या अडीच तासांत प्रशासनानं त्यांच्या घरापर्यंत पक्का रस्ता बनवला आहे.

विशेष म्हणजे १२ वर्षापूर्वी ही गल्ली बनवण्यात आली होती मात्र आज याठिकाणी डांबर टाकण्यात आले आहे. पृथ्वी सिंह चौहान यांच्या घराशेजारी राहणारे भरत कुमार यांनी सांगितले की, मागील १२ वर्षापासून या गल्लीत मोठमोठे खड्डे पडले होते. आता हा रस्ता नवीन बनवण्यात आला आहे. मात्र अद्याप पूर्ण रस्ता बनवण्यात आला नाही. जिथंपर्यंत डांबर टाकण्यात आले आहेत तिथून पुढे आरसीसी रस्ता बनवण्यात येणार आहे. पृथ्वी सिंह चौहान यांच्या लहानपणीचे ते मित्र आहेत. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी विंग कमांडर पृथ्वी घरी आले होते. तेव्हा त्यांच्यासोबत अखेरचं बोलणं झाल्याचं शेजाऱ्यांनी सांगितले.

आज होणार पृथ्वी सिंह चौहान यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वी सिंह चौहान यांचे पार्थिव शनिवारी विमानाच्या माध्यमातून आगरा येथे आणण्यात येईल. तेथून सरन नगर येथील त्यांच्या घरी पार्थिव नेले जाईल. त्यानंतर इथेच गावकरी त्यांचे अत्यंदर्शन घेतील. दुपारपर्यंत ताजगंज स्मशान भूमीत विंग कमांडर यांच्यावर अत्यंविधी पार पडतील.

पहिली पोस्टिंग हैदराबाद येथे झाली

एअरफोर्स ज्वाईन केल्यानंतर पृथ्वी सिंह चौहान यांची पहिली पोस्टिंग हैदराबाद इथं झाली होती. त्यानंतर गोरखपूर, गुवाहाटी, उधमसिंह नगर, जामनगर, अंदमान निकोबार याठिकाणी ते तैनात होते. १ वर्षाच्या विशेष ट्रेनिंगनंतर त्यांना सूडान येथे पाठवले होते. MI-17 हेलिकॉप्टरचं उडवण्यामध्ये विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान माहीर होते. सूडानमध्ये ट्रेनिंग घेतलेल्या पृथ्वी यांचा उल्लेख लडाऊ विमान पायलटमध्ये होत होती. तामिळनाडूत जे बिपिन रावत यांच्यासह १३ जण शहीद झाले. त्यातील पृथ्वी सिंह चौहान एक आहेत.

Web Title: Helicopter Crash: Wing commander prithvi singh funeral road built in two and half hours in agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.