जम्मू-काश्मीरच्या लखनपूरमध्ये लष्काराचे हेलिकॉप्टर क्रॅश, दोन जवान गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 21:29 IST2021-01-25T21:28:34+5:302021-01-25T21:29:01+5:30
A helicopter force-lands in Kathua, Jammu and Kashmir : या दोन्ही जवानांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

जम्मू-काश्मीरच्या लखनपूरमध्ये लष्काराचे हेलिकॉप्टर क्रॅश, दोन जवान गंभीर जखमी
जम्मू -काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील लखनपूर परिसरात भारतीय लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या दुर्घटनेत लष्काराचे दोन जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही जवानांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कठुआ जिल्ह्यातील लखनपूर परिसरात जम्मू-काश्मीर-पंजाब सीमेजवळ भारतीय लष्काराचे ध्रुव ALH हे हेलिकॉप्टरचे टेक ऑफ करताना कोसळले. या घटनेला कठुआचे पोलीस अधीक्षक शैलेंद्र कुमार मिश्रा यांनी दुजोरा दिला आहे.
A helicopter force-lands in Kathua, Jammu and Kashmir. More details awaited: PRO Defence, Jammu
— ANI (@ANI) January 25, 2021
शैलेंद्र कुमार मिश्रा यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत सांगितले सी, लखनपूरच्या जवळ भारतीय लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या दुर्घटनेत 2 पायलट जखमी झाले आहेत. जखमींना पठाणकोटच्या मिल्ट्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.