एलिफंटासाठी हेलिकॅप्टर सेवा

By Admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:56+5:302015-02-14T23:50:56+5:30

पर्यटक आनंदित : लाँच मालकांमधून नाराजीचा सूर

Helicopter service for Elephanta | एलिफंटासाठी हेलिकॅप्टर सेवा

एलिफंटासाठी हेलिकॅप्टर सेवा

googlenewsNext
्यटक आनंदित : लाँच मालकांमधून नाराजीचा सूर
मधूकर ठाकूर, उरण : जागतिक हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या एलिफंटा बेटावर देशी-विदेशी पर्यटकांसाठी हेलिकॅप्टरने सेवा पुरविण्याची तयारी गिरीसन एअरवेजने सुरू केली आहे. बेटावर पर्यटकांना घेऊन लॅण्डींग करण्यासाठी आणि सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी संबंधित कंपनीने राज्य सरकारकडे केली आहे. उरणचे तहलिसदार नितीन चव्हाण यांनी ही माहिती दिली.
एलिफंटा बेटावरील काळ्या पाषाणातील कोरलेली अद्भूत लेणी पाहाण्यासाठी दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक येतात. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून बेटावर पर्यटकांसाठी खासगी प्रवासी लाँच सेवा उपलब्ध आहे. तिथे पोहोचल्यापासून परतण्यापर्यंत चार-पाच तासांचा वेळ मिळतो. हा वेळ पर्यटकांना एलिफंटा बेट फिरण्यासाठी अपुरा ठरतो. या प्रवासी लाँच सेवेवर बंदर विभागाचे नियंत्रण आहे. मात्र पर्यटकांकडून परतीच्या प्रवासासह भरभराठ तिकीट दर आकारूनही त्यांना चांगली सेवा दिली जात नाही. त्यामुळे पर्यटक नेहमीच नाराजी व्यक्त करतात. त्याचबरोबर पर्यटकांसाठी दिल्या जाणार्‍या सोयी सुविधांचीही वानवा असते. खासगी कंपनीच्या लाँच मालकांच्या मनमानी कारभाराला पर्यटक नेहमीच बळी पडतात. त्यांना कमी वेळेत बेटावर पोहचता यावे आणि एलिफंटा बेटावरील लेणी पाहण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी गिरीसन एअरवेजने कंपनीने मुंबई ते एलिफंटा या मार्गावर हेलिकॅप्टर सेवा पुरविण्याची तयारी सुरू केली आहे. (वार्ताहर)
..
- सहा ते बारा आसन क्षमतेची हेलिकॅप्टर उपलब्ध करून देण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे.
- एलिफंटा बेटावर हेलिकॅप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅडची आवश्यकता आहे. त्यासाठी समुद्र किनार्‍यावर १२ एकर जागेची आवश्यकता आहे. ही जागा राज्य सरकारने उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी गिरीसन एअरवेजने केेली आहे.
- बेटावर संबंधित कंपनीला हेलीपॅड आणि अन्य सोयीसुविधा पुरविण्यासाठी जागा उपलब्ध करून देता येईल का, याचा अहवाल राज्य सरकारने रायगड जिल्हाधिकार्‍यांकडून मागविला आहे.
- जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत उरण तहसिलदारांकडे विचारणा करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत काम सुरू असल्याची माहिती उरणचे तहसिलदार नितीन चव्हाण यांनी दिली.
- जागा उपलब्ध झाल्यास एलिफंटा बेटावर पर्यटकांसाठी लवकरच हेलिकॅप्टर सेवा उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Helicopter service for Elephanta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.