Akhilesh Yadav: 'इंधन भरण्यासाठी हेलिकॉप्टर थांबवले', अखिलेश यांच्या आरोपावर सरकारचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 06:35 PM2022-01-28T18:35:38+5:302022-01-28T18:36:51+5:30
अखिलेश यादव यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर त्यांचे हेलिकॉप्टर थांबवल्याचा आरोप केला होता.
नवी दिल्ली: समाजवादी पार्टीचे सुप्रिमो अखिलेश यादव यांचे हेलिकॉप्टर थांबवल्याच्या प्रकरणाने जोर धरला आहे. पण, आता याच प्रकरणाबाबत सरकारी सूत्रांकडून मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यांचे हेलिकॉप्टर जाणूनबुजून नाही, तर इंधन भरण्यासाठी थांबवण्यात आले होते. इंधन भरल्यानंतर त्यांना तातडीने उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली.
अखिलेश यादव यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर त्यांचे हेलिकॉप्टर मुद्दामून रोखून धरल्याचा आरोप केला होता. अखिलेश यांच्या वेळापत्रकानुसार दुपारी एकच्या सुमारास त्यांची मुझफ्फरनगरमध्ये पत्रकार परिषद होती, मात्र ते दुपारी अडीच वाजेपर्यंत दिल्लीतच होते. पण, काही वेळाननंतर त्यांनी मुझफ्फरनगरकडे उड्डाण घेतले.
मेरे हैलिकॉप्टर को अभी भी बिना किसी कारण बताए दिल्ली में रोककर रखा गया है और मुज़फ़्फ़रनगर नहीं जाने दिया जा रहा है। जबकि भाजपा के एक शीर्ष नेता अभी यहाँ से उड़े हैं। हारती हुई भाजपा की ये हताशा भरी साज़िश है।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) January 28, 2022
जनता सब समझ रही है… pic.twitter.com/PFxawi0kFD
अखिलेश यांचे ट्विट
'माझे हेलिकॉप्टर कोणतेही कारण न देता दिल्लीमध्ये रोखून धरण्यात आले आहे. मला मुजफ्फरनगरला जाऊ दिले जात नाहीय. भाजपचा एक वरिष्ठ नेता आताच इथून रवाना झाला आहे. हरत असलेल्या भाजपाची निराशेने भरलेला कट आहे. जनता सर्व पाहतेय", असे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे.
अखिलेश यांचे दुसरे ट्विट
अखिलेश यादव यांना विमान प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केले होते. जवळपास 40 मिनिटांनी केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये अखिलेश म्हणाले, आता हेलिकॉप्टरद्वारे उड्डाण घेत असल्याचे म्हटले. सत्तेचा दुरुपयोग हा हरणाऱ्या लोकांचे चिन्ह आहे, समाजवादी संघर्षाच्या इतिहासात हा दिवस नोंद होईल, असे त्यांनी म्हटले आहे.