हॅलो 1- मसणदेवीच्या दर्शनास गर्दी

By admin | Published: September 1, 2015 09:38 PM2015-09-01T21:38:15+5:302015-09-01T21:38:15+5:30

डिचोली : नार्वे येथील मसणदेवीचा जत्रोत्सव शेकडो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. नवसाला पावणारी देवी, अशी ख्याती असलेल्या या मंदिरात सकाळपासून ओटी भरण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होती.

Hello 1- Dazzling crowd of Mansadevi | हॅलो 1- मसणदेवीच्या दर्शनास गर्दी

हॅलो 1- मसणदेवीच्या दर्शनास गर्दी

Next
चोली : नार्वे येथील मसणदेवीचा जत्रोत्सव शेकडो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. नवसाला पावणारी देवी, अशी ख्याती असलेल्या या मंदिरात सकाळपासून ओटी भरण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होती.
या ठिकाणी नवस केल्यास त्याचा लाभ होतो, तसेच गरोदर महिला मृत झाल्यावर या ठिकाणी पुरण्यात येतात व त्यांच्या आत्म्याला शांती लाभते, असा समज पूर्वीपासून रुढ आहे. एखाद्या दाम्पत्याला अपत्य होत नसेल तर इथे प्रार्थना केल्यास कामना पूर्ण होते, अशीही आख्यायिका असून या वैशिष्ट्यपूर्ण जत्रोत्सवाला मोठी गर्दी लोटते.
मंदिरासमोरच कार्ज‍याचे झाड व पेड असून आपले नवस पूर्ण होण्यासाठी तांब्याच्या पत्र्याला व तांब्याला खिळा ठोकून कार्ज‍याला ठोकण्याची अनोखी परंपरा आहे. पाळणेही बांधण्याची परंपरा आहे.
जत्रोत्सवात मोठी फेरी भरली होती. चणे फुटाण्याच्या भ?य़ाही उभारण्यात आल्या होत्या. पोलिसांनी चोख वाहतूक व्यवस्था केल्याने भाविकांना सुखरूपपणे येणे व दर्शन घेणे सोयीस्कर झाले. रात्रीच्या वेळी येथे भुतांचा वावर असल्याची आख्यायिका आहे. (प्रतिनिधी)
फोटो ओळी-
मसणदेवी जत्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी.
मंदिरासमोरील पेडावर नवस फेडताना भाविक.
जत्रोत्सवात भरलेली भव्य फेरी.
चण्याच्या भ?ीत चणे भाजताना एक दुकानदार.

Web Title: Hello 1- Dazzling crowd of Mansadevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.