हॅलो १- साळ बंधार्यावरील धांगडधिंगाणा रोखण्यास पोलीस
By admin | Published: May 5, 2015 01:22 AM2015-05-05T01:22:07+5:302015-05-05T01:22:07+5:30
फोटो : साळ बंधार्याची पाडरी करताना उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर, आमदार नरेश सावळ, मामलेदार देसाई. (छाया : विशांत वझे)
Next
फ टो : साळ बंधार्याची पाडरी करताना उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर, आमदार नरेश सावळ, मामलेदार देसाई. (छाया : विशांत वझे)डिचोली : साळ येथील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या बंधार्यार धांगडधिंगाणा वाढत चालला असून मौजमजा कर्यासाठी येणार्या हौशी लोकांकडून दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे व बाटल्या काचा, कचरा फेकण्याचे प्रकार वाढीस लागले असून उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर, मामलेदार गुरूदास देसाई आमदार नरेश सावळ यांनी परवा या ठिकाणाला भेट देऊन कडक पोलीस पहारा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंसाधन खात्याचे साळ --- नदीवर बंधारा वजा छोटा पूल उभारून डिचोली व पेडणे तालुक्याला जोडलेले आहे. बंधार्याच्या एका बाजूला आंघोळीसाठी निसर्गरम्य वातावरण असून मुबलक पाणी असल्याचे पर्यटनाची गोव्याच्या कानाकोपर्यातून रिघ लागते. या ठिकाणी मांडयान या भागात देवाचे पवित्र स्थान असल्याने या भागात पर्यटकांना धांगडधिंगाणा बाधा आणत असून या बाबत स्थानिक सरपंच घन:श्याम राऊत यांनी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. परवा उपजिल्हाधिकारी, मामलेदार, आमदार नरेश सावळ, जलसंसाधन खात्याचे अभियंता, पी.व्ही. श्रीकुमार, सरपंच घन:श्याम राऊत, पंचायत मंडळाने या भागाचा दौरा करून परिस्थिती जाणून घेतली. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक गोंधळ घालतात. काही लोक दारू पितात, जेवण, प्लास्टिक नदीतच टाकून प्रदूषण करतात. ही बाब आमदार सावळ व सरपंच राऊत यांनी उपजिल्हाधिकार्यांच्या नजरेस आणून दिली. पहारा ठेवणार : उपजिल्हाधिकारीया ठिकाणी देवाचे पवित्र स्थान असल्याने दारू व इतर गोष्टीमुळे जो त्रास होतो त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात करून पहारा ठेवण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर यांनी सांगितले. मोठ्या संख्येने लोक येत असल्याने नियंत्रण ठेवायला हवे व पर्यटकांनी आनंद जरूर लुटावा पण मस्ती करू नये, कचरा करू नये असे आवाहन आमदार नरेश सावळ यांनी केले आहे. मामलेदार गुरूदास देसाई यांनी जनतेला चांगल्या प्रकारे या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असून मे महिन्यात गर्दी वाढत असल्याने आवश्यक बंदोबस्त करण्यात आला असल्याचे सांगितले. उत्कृष्ट पर्यटन स्थळ हा परिसर निसर्गाचे वरदान ठरलेला असून योग्य नियोजन करून केरकचरा, दारूबंदी लागू करून स्वच्छता राखण्याची गरज असून येथे फिरते शौचालय, कपडे बदलण्यासाठी रूम्स, तसेच स्थानिकांना खाद्यपदार्थ विकण्यासाठी सोय केल्यास गावाला फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत मात्र अंधाधुंदी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नसल्याचे सरपंच घन:श्याम राऊत यांनी सांगितले.