हॅलो २/३- मांद्रे गाईड

By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:37+5:302015-02-14T23:51:37+5:30

स्काउट ॲण्ड गाईडचा केरी गावामध्ये मेळावा

Hello 2 / 3- Mandre Guide | हॅलो २/३- मांद्रे गाईड

हॅलो २/३- मांद्रे गाईड

Next
काउट ॲण्ड गाईडचा केरी गावामध्ये मेळावा
मांद्रे : स्काउट ॲण्ड गाईडच्या माध्यमातून जीवनात आवश्यक असलेले सार्वभौम शिक्षण प्राप्त होते. शिस्त, संघटन, पोषक वातावरण, निसर्ग, पर्यावरण आदी गुणांचे संकलित शिक्षण मिळून व्यक्तिमत्त्व विकास होतो, असे प्रतिपादन स्काउट गाईडचे राज्याचे मुख्य आयुक्त पांडुरंग नाडकर्णी यांनी केले.
केरी (पेडणे) येथे स्काउट ॲण्ड गाईडच्या जिल्हा मेळाव्यात नाडकर्णी प्रमख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी केरी न्यू इंग्लिश हायस्कूलचे चेअरमन डॉ. अनंत नाईक, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका बर्था फर्नांडिस, पेडणे शेतकरी सहकारी सोसायटीचे चेअरमन मिलिंद केरकर, सरपंच जयंत केरकर, विद्याप्रसारक हायस्कूल मोरजीचे मुख्याध्यापक दिलीप मेथर, स्काउट गाईडचे जिल्हा आयुक्त केशव पणशीकर, पेडणे भगवती हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद कोचीकु˜म, जिल्हा सचिव चंद्रकांत सांगाळे, जिल्हा खजिनदार किशोर किनळेकर, संस्थेचे खजिनदार शशिकांत कुबल, उत्तम कोटकर, जी. व्ही. परब आदी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी केरी गावातून सामूहिक जागृती रॅली काढली. रवळनाथ देवस्थान ते आजोबा देवस्थान व केरी फेरी धक्का ते केरी न्यू इंग्लिश हायस्कूलपर्यंत रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या मेळाव्याचे सरपंच जयंत केरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
डॉ. अनंत नाईक म्हणाले, स्काउट ॲण्ड गाईड म्हणजे जीवनाला आकार देण्याचे शिक्षण आहे. यासाठी जीवनात पौष्टिक आहारालाही अधिक महत्त्व द्या, असे सांगून त्यांनी पौष्टिक आहार कसा असावा, याबद्दल माहिती दिली.
मिलिंद केरकर यांनी एकसंघ राहून जीवनाचा निखळ आनंद शोधणे हेच जीवन सुखकर करण्याचे तंत्र असल्याचे सांगितले. जयंत केरकर यांनी स्काउट गाईडच्या मेळाव्याच्या शिस्तबद्ध आयोजनाबद्दल कौतुक केले व या शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श जीवनाचा पाया घालण्याचे आवाहन सरपंच केरकर यांनी केले. प्रास्ताविक बर्था फर्नांडिस यांनी केले. केशव पणशीकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. चंद्रकांत सांगाळे यांनी अहवाल वाचन केले. स्नेहा आजगावकर यांनी सूत्रसंचालन केले. जेरोनीमा फर्नांडिस यांनी आभार मानले. मेळाव्यात पेडणे तालुक्यातील एकूण १४ विद्यालये सहभागी झाली होती. (प्रतिनिधी)
फोटो ओळी: केरी (पेडणे) येथील स्काउट गाईड रॅलीत सहभागी विद्यार्थी. (छाया : लक्ष्मण ओटवणेकर)

Web Title: Hello 2 / 3- Mandre Guide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.