हॅलो २ : फोंड्यात डिजिटल गोवाची ई-कॉमर्स कार्यशाळा

By admin | Published: July 8, 2015 11:45 PM2015-07-08T23:45:07+5:302015-07-08T23:45:07+5:30

फोंडा : मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वसामान्यांच्या खरेदी-विक्रीच्या संकल्पना झपाट्याने बदलत आहेत. या बदलत्या प्रवाहात वरचढ ठरण्यासाठी नव्हे तर तग धरण्यासाठीसुद्धा सर्व लहान-मोठ्या, शहरी तसेच ग्रामीण उद्योगांनी ई-कॉमर्स तंत्रज्ञानाचा वापर खुबीने आणि डोळसपणे करणे ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने डिजिटल गोवा या पणजीस्थित संस्थेने फोंड्यातील उद्योजक, व्यावसायिकांसाठी एक अर्धदिवसीय ई-कॉमर्स कार्यशाळेचे आयोजन केले होते. फोंडा बिझनेस आणि प्रोफेशनल फोरम या फोंड्यातील उद्योजक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. दक्षिण गोव्याचे खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी डिजिटल गोवाचे संस्थापक नीरज नाईक, फोंडा बिझनेस आणि प्रोफेशनल फोरमचे अध्यक्ष संजय फोंडेकर, उद्योजक प्रमोद सावंत आदी मान्यवर उपस्थित हो

Hello 2: Digital Goa's e-commerce workshop in Phland | हॅलो २ : फोंड्यात डिजिटल गोवाची ई-कॉमर्स कार्यशाळा

हॅलो २ : फोंड्यात डिजिटल गोवाची ई-कॉमर्स कार्यशाळा

Next
ंडा : मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वसामान्यांच्या खरेदी-विक्रीच्या संकल्पना झपाट्याने बदलत आहेत. या बदलत्या प्रवाहात वरचढ ठरण्यासाठी नव्हे तर तग धरण्यासाठीसुद्धा सर्व लहान-मोठ्या, शहरी तसेच ग्रामीण उद्योगांनी ई-कॉमर्स तंत्रज्ञानाचा वापर खुबीने आणि डोळसपणे करणे ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने डिजिटल गोवा या पणजीस्थित संस्थेने फोंड्यातील उद्योजक, व्यावसायिकांसाठी एक अर्धदिवसीय ई-कॉमर्स कार्यशाळेचे आयोजन केले होते. फोंडा बिझनेस आणि प्रोफेशनल फोरम या फोंड्यातील उद्योजक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. दक्षिण गोव्याचे खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी डिजिटल गोवाचे संस्थापक नीरज नाईक, फोंडा बिझनेस आणि प्रोफेशनल फोरमचे अध्यक्ष संजय फोंडेकर, उद्योजक प्रमोद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
ई-कॉमर्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी करण्याची गरज व्यक्त करताना खासदार नरेंद्र सावईकर म्हणाले की , वाणिज्य स्थायी समितीचा सदस्य या नात्याने भारतातील अनेक भागांत फिरताना असे जाणवले की, सगळीकडे माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने झपाट्याने क्रांती घडत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात आम्ही कुठे मागे तर राहात नाही ना, असा प्रश्न पडतो. सावईकर पुढे म्हणाले की, गोव्यातील माहिती तंत्रज्ञान संबंधित सर्व उद्योग, व्यावसायिक तसेच अन्य संबंधित लोकांची बैठक यावर्षी सप्टेंबर दरम्यान घेण्याचा सरकारचा मानस आहे. सर्व संबंधिताना एका व्यासपीठावर आणून त्यांच्या गरजेनुरूप भरीव कार्यक्रम हाती घेण्यात येईल.
डिजिटल गोवाचे संस्थापक नीरज नाईक म्हणाले की, व्यावसायिकांनी ई-कॉमर्स तंत्रज्ञान लवकरात लवकर आत्मसात करून आपल्या उद्योगधंद्यात त्याचा प्रभावीपणे वापर करण्याची गरज आहे. एरवी माहिती तंत्रज्ञान संबंधित उद्योग धंद्यांच्या तसेच ई-गव्हर्नंसच्या क्षेत्रात गोवा इतर राज्यांच्या तुलनेत मागे पडला आहे. निदान ई-कॉमर्सच्या बाबतीत तरी याची पुनरावृत्ती होऊ न देणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे.
ई-कॉमर्स तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायवृद्धीसाठी प्रभावीपणे कसा करता येऊ शकतो, यावर संबंधित क्षेत्रातील अनुभवी तज्ञांद्वारे कार्यशाळेत सोप्या शब्दांत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रसिद्ध गुगल ॲप डेव्हलपर ॲँड्रॉईड मीडिया प्रा. ली. चे संचालक प्रज्योत माईणकर, स्वर्ड लिओ सिस्टिमचे व्यवस्थापकीय संचालक गौतम फातर्पेकर, थर्ड आय टेक्नॉलॉजीचे संस्थापक संचालक रोहित नाईक, बिझनेस डेव्हलपमेंटचे प्रमुख अजित अग्रनायक आणि टेक्निकल ऑफ इमॅजिन वर्कचे प्रमुख अग्रज अग्रनायक यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. सर्वसामान्यांपयंर्त माहिती तंत्रज्ञानाचे फायदे पोहोचवण्यासाठी डिजिटल गोवा संस्थेने हा उपक्रम राबवला होता.

Web Title: Hello 2: Digital Goa's e-commerce workshop in Phland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.