हॅलो 3- पार्से येथे दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन
By admin | Published: August 11, 2015 10:11 PM2015-08-11T22:11:38+5:302015-08-11T22:11:38+5:30
पेडणे : पार्से शाळा समूह आयोजित साळ-मधलावाडा येथील छंदोपासक नारायण च्यारी यांच्या दुर्मिळ चित्र तसेच वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कोरगाव येथील र्शी कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विठोबा बगळी यांच्या हस्ते करण्यात आले.
Next
प डणे : पार्से शाळा समूह आयोजित साळ-मधलावाडा येथील छंदोपासक नारायण च्यारी यांच्या दुर्मिळ चित्र तसेच वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कोरगाव येथील र्शी कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विठोबा बगळी यांच्या हस्ते करण्यात आले. पार्से येथील पार्से हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच गोपाळ भिसाजी, पार्से हायस्कूलचे चेअरमन अजय कळंगुटकर, मुख्याध्यापक मोहनदास देसाई, शिक्षक विनोद पित्रे, चित्रकार नारायण च्यारी, सुजित राणे, मंगेश कानोळकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन विठोबा बगळी यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रकार नारायण च्यारी यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. या प्रदर्शनात प्रामुख्याने निरनिराळ्या रूपात सुमारे 1200 गणपतीची रेखाचित्रे काढून त्याच्या फ्रेम बनविल्या होत्या. दीडशेपेक्षा जास्त फुला-फळांपासून बनवलेले गणपती, 75 देशांतील चलनी नोटा व नाण्यांचा संग्रह, 140 देशविदेशातील जुन्या-नव्या नाण्यांचा संग्रह, पाच हजार खेळातील पत्त्यांचा संग्रह, पाच हजार काड्यापेट्यांचा संग्रह, हजारो पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह, जहाज, विमान, बंगले, गाड्या यांच्या विविध मॉडेल्सचा संग्रह, 5500 धार्मिक पुस्तकांचा संग्रह, निसर्गरम्य फळाफुलांद्वारे गणपतीचे प्रकटीकरण, हजारो गणपती ग्रिटिंग कार्डचा संग्रह, 750 विविध डिझाइन्सच्या बाटल्या, विमानाच्या शोधापासून ते आधुनिक विमानाच्या छायाचित्रांचा संग्रह, विविध बोटींच्या चित्रांचा संग्रह, पशू, पक्षी, जनावरे, सरपटणारे प्राणी यांच्या चित्रांचा संग्रह अशा अनेकविध चित्र तसेच वस्तू या प्रदर्शनात मांडल्या होत्या. या प्रदर्शनात पार्से हायस्कूल, सरकारी प्राथमिक विद्यालय चोनसाई, वायडोंगर पार्से, मधलावाडा पार्से, चावदेवाडा पार्से, मुरमुसे-तुये या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच पार्से परिसरातील विद्यालयांनी लाभ घेतला. विनोद पित्रे यांनी हे चित्रप्रदर्शन पुरस्कृत केले होते. त्यांनीच स्वागत केले व आभार मानले. फोटो : पार्से येथील पार्से हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या प्रदर्शनाची माहिती देताना नारायण च्यारी. बाजूला विठोबा बगळी, सरपंच गोपाळ भिसाजी, अजय कळंगुटकर, मोहनदास देसाई. (छाया : निवृत्ती शिरोडकर)