हॅलो ३ वास्को-सांगोल्डा साईभक्तांची पदयात्रा
By admin | Published: April 4, 2015 01:54 AM2015-04-04T01:54:58+5:302015-04-04T01:54:58+5:30
वास्को : सांगोल्डा येथील साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त सडा एमपीटी कॉलनी येथील साईभक्त मंडळाचे भक्तगण वास्को ते सांगोल्डा पदयात्रेस रवाना झाले.
Next
व स्को : सांगोल्डा येथील साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त सडा एमपीटी कॉलनी येथील साईभक्त मंडळाचे भक्तगण वास्को ते सांगोल्डा पदयात्रेस रवाना झाले. विश्वास सातार्डेकर यांनी येथील पर्यटक टॅक्सी स्टॅण्डजवळच्या साई मंदिरात सर्वप्रथम पूजा करून या पदयात्रेचा प्रारंभ केला़ या वेळी वीजमंत्री मिलिंद नाईक तसेच वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा उपस्थित होते़ सुमारे २०० साईभक्त सहभागी झालेल्या पदयात्रेत वीजमंत्री मिलिंद नाईक आणि आमदार कार्लुस आल्मेदा यांनीही भाग घेतला. साईभक्त मंडळाचे अध्यक्ष प्रदीप नाईक, उपाध्यक्ष राजू कळंगुटकर, अमर नाईक, शांतीलाल कानोजी, नंदादीप राऊत, दिनेश कळंगुटकर, अजित परब, पर्यटक टॅक्सी स्टॅण्ड श्री साईबाबा मंदिराचे अध्यक्ष शेखर परुळेकर, खजिनदार नरेश नाईक यांचा या पदयात्रेत सक्रिय सहभाग आहे़ वास्को ते सांगोल्डा हे सुमारे ४२ कि़मी़ अंतर हे भक्तगण पार करणार असून या मार्गावर अनेक ठिकाणी साईभक्त त्यांची सेवा करतील.तसेच या मार्गावरील गावांतील अनेक भक्तगण सहभागी होणार आहेत़ (प्रतिनिधी) फ ोटो आहे : ०२०४ वीएएस ०२ ओळी : साईभक्त मंडळ एमपीटी कॉलनी येथील साईभक्तांनी सांगोल्डा येथील साईमंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त वास्को ते सांगोल्डापर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेत वीजमंत्री मिलिंद नाईक आणि वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा सहभागी झाले़ छाया : अनिल चोडणकर