हॅलो ४-
By admin | Published: July 22, 2015 12:34 AM2015-07-22T00:34:12+5:302015-07-22T00:34:12+5:30
वाचन नसल्याने ज्ञानात कमी : टिकलो
Next
व चन नसल्याने ज्ञानात कमी : टिकलोबार्देस : शिक्षणाला फार महत्त्व प्राप्त झालेले आहे. पूर्वीचे लोक अशिक्षित असले तरी बुद्धीने हुशार होते. नागरिकांना आजूबाजूला होणार्या घटनांचे भान होते; परंतु आताची युवा पिढी संगणक हाताळून त्याद्वारे माहिती मिळवतात. त्यामुळे त्यांना बाहेरील जगात काय चालले याबाबत संगणकाद्वारे समजते. तसेच विद्यार्थ्यांचे वाचन कमी झालेले असल्याची खंत हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी व्यक्त केले. हळदोणा मतदारसंघातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवूण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पॅरिस सेंटर हळदोणा येथे आयोजित केलेल्या गौरव समारंभात ते बोलत होते. या वेळी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर हळदोणे मतदारसंघाचे गटाध्यक्ष फ्रँकी कार्व्हालो, सतिश म्हापसेकर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.टिकलो म्हणाले, हळदोणा मतदारसंघातील युवा पिढीने सुशिक्षित होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच पुढाकार घेणार आहे. हळदोणे मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसून त्यांनी ठेवलेल्या विश्वासाला मान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)फोटो : हळदोणा येथे आयोजित केलेल्या गौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांसोबत आमदार ग्लेन टिकलो. सोबत इतर पदाधिकारी (छाया : प्रकाश धुमाळ) २१०७एमएपी०८-०७ जेपीजी