हॅलो ४- कला अकादमीत ११ रोजी गोमंत रंगभूमी दिन

By admin | Published: July 8, 2015 11:45 PM2015-07-08T23:45:09+5:302015-07-08T23:45:09+5:30

पणजी : गोमंतकीय आद्य नाटककार स्व. कृष्णंभ˜ बांदकर यांचा जन्मदिवस म्हणजे ११ जुलै गोवा कला अकादमी गोमंत रंगभूमी दिन म्हणून गेली तीन वर्षे साजरा करीत आहे. यंदाचा गोमंत रंगभूमी दिन शनिव२ा दि. ११ जुलै रोजी सायं. ४.३० वा. अकादमीच्या कृष्णकक्षात होणार आहे. यावेळी प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू वाघ हे भूषवतील. यावेळी अकादमीचे उपाध्यक्ष सुशांत खेडेकर व सदस्य सचिव दीपक देसाई उपस्थित राहतील.

Hello 4- Gomant Rangbhoomi day at the Art Academy on 11th | हॅलो ४- कला अकादमीत ११ रोजी गोमंत रंगभूमी दिन

हॅलो ४- कला अकादमीत ११ रोजी गोमंत रंगभूमी दिन

Next
जी : गोमंतकीय आद्य नाटककार स्व. कृष्णंभ˜ बांदकर यांचा जन्मदिवस म्हणजे ११ जुलै गोवा कला अकादमी गोमंत रंगभूमी दिन म्हणून गेली तीन वर्षे साजरा करीत आहे. यंदाचा गोमंत रंगभूमी दिन शनिव२ा दि. ११ जुलै रोजी सायं. ४.३० वा. अकादमीच्या कृष्णकक्षात होणार आहे. यावेळी प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू वाघ हे भूषवतील. यावेळी अकादमीचे उपाध्यक्ष सुशांत खेडेकर व सदस्य सचिव दीपक देसाई उपस्थित राहतील.
याप्रसंगी गोमंतकीय विशेषत: उत्सवी रंगभूमीला योगादन दिलेल्या सहा ज्येष्ठ नाट्य कलाकारांचा गौरव कृष्णंभ˜ बांदकर पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. यंदाचे गौरवमूर्ती म्हणून काशिनाथ यशवंत नाईक, कष्टी, काले, मनोहर दत्ता सातोर्डेकर, ताळगाव, विलास कृष्णा परब, विर्नोडा, गुरूदास बाबुलो गाड, उसगाव, सुकडो अर्जुन गावकर, धारगे, तांबडी सुर्ल व स्नेहा पुणेकर, कुळण, सर्वण यांची निवड करण्यात आली आहे. सर्व गौरवमूर्तींना कृष्णंभ˜ चांदकर पुरस्कार व दहा हजार रुपयांचा धनादेश, प्रशस्तीपत्र व शाल देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर कृतार्थ, म्हार्दोळ या पथकाकडून दशावतारी (रातकाला) लोकनाट्याचे सादरीकरण प्रस्तुत करण्यात येईल. तरी या कार्यक्रमास सर्व नाट्यकर्मी व कलारसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे कला अकादमीच्यावतीने कळविण्यात आले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Web Title: Hello 4- Gomant Rangbhoomi day at the Art Academy on 11th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.