हॅलो 4 : नार्वेत गोकुळ अष्टमी ऐतिहासिक परंपरा
By Admin | Published: September 4, 2015 09:54 PM2015-09-04T21:54:25+5:302015-09-04T21:54:25+5:30
नार्वे गावच्या गोकुळ अष्टमीचा इतिहास
न र्वे गावच्या गोकुळ अष्टमीचा इतिहासर्शीकृष्णाच्या जन्म दिवस म्हणून गोकुळाष्टमी साजरी केली जाते. हा र्शी कृष्णाचा जन्मदिवस सर्वत्र आनंदाने साजरा करण्यात येतो़ काही ठिकाणी हा दिवस र्शीजयंती म्हणून तर काही ठिकाणी कृष्णाष्टमी म्हणून साजरा केला जातो़र्शीकृष्ण जन्माष्टमी हिंदू लोक मोठा सण म्हणून साजरी करतात. त्या दिवशी उपवास केला जातो व र्शीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस म्हणजेच मध्यरात्री सोडला जातो. गोव्याचे र्शीकृष्णाशी पौराणिक संबंध आहेत. असे समजले जाते की, गोव्यामध्ये र्शीकृष्ण व मगधाचा राजा जरासंधाचे युद्ध झाल़े त्यात र्शीकृष्णाचा विजय झाला. या विजयानंतर देवकी (र्शीकृष्णाची आई) व र्शीकृष्णाची चुडमनी बेट जे आताचे चोडण गाव म्हणून ओळखले जाते, तेथे त्यांची भेट झाली. या भेटीच्या वेळी देवकीने बाळ र्शीकृष्णाला आपले दूध पाजले. अशी आख्यायिका आहे. या ठिकाणी म्हणजेच चोडण या गावी पुरातनाप्रमाणे देवकीकृष्णाचे देऊळ होते; पण पोतरुगीज राजवटीत हे देऊळ मार्शेल गावी हलवण्यात आले. गोव्यामधील डिचोली गावी कृष्ण जन्माष्टमी मोठय़ा प्रमाणात साजरी केली जाते. जन्माष्टमी दिवशी या गावातील हिंदू लोक पवित्र स्नान करून अंगाईगीत गातात. राधाकृष्ण मुरलीधर संस्थान साखळी, गोपाळकृष्ण देऊळ अडवलपाल व इतर देवळांत कृष्णाची मूर्ती सजवलेल्या पाळण्यात घालून लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येते. नार्वे हे असेच गोव्यातील एक गाव. जिथे र्शीकृष्ण जन्माष्टमी एका वेगळ्या पद्धतीने पंचगंगा नदीच्या तीर्थावर साजरी केली जाते. या तीर्थाला पूर्वीच्या काळी ‘कोकण काशी’ म्हणत होते. या पंचगंगा म्हणजेच पंचनद्यांच्या संगम. त्या नद्या म्हणजेच वाळवंटी, खांडेपार, जुवारी, म्हादई आणि मांडवी यांचा संगम़ या दिवशी हजारोंनी र्शद्धाळू येऊन या पंचसंगमावर स्नान करून देवाचे दर्शन घेतात. तेथे असलेला देव र्शीकृष्ण, देव काळोबा व इतर देवांना फुले व बेल घालून आशीर्वाद घेतात. शांतादुर्गा, चामुंडा, महालक्ष्मी, कणकादेवी पालखी या तीर्थावर येतात. र्शद्धाळू त्यासाठी दर्शन घ्यायला वाट बघत असतात. त्या पालखीचे दर्शन घेऊन ते र्शद्धाळू आपल्या घरी निघतात. या दिवशी नार्वे या गावी पंचगंगा तीर्थ येथे जत्रेचे वातावरण असते. लोक येथे मिठाई, खेळणी तसेच लाकडी वस्तू खरेदी करतात. यासाठी गोवा सरकारतर्फे दिवार फेरी, चोडण फेरी अशा जास्ती फेर्या ठेवलेल्या असतात. जेणेकरून र्शद्धाळू लोकांना ये-जा करण्यासाठी व्यवस्था होईल़या दिवशी घरी पाहुणे येतात. त्यांच्यासाठी जेवण करून प्रसाद कौल जातो. असे समजले जाते की, उपवास केल्याने आपले पुढील वर्ष सुखी व आनंदी जाईल. त्या दिवशी दुपारी दहीहंडीचा समारंभ साजरा केला जातो. नार्वे गावामध्ये एकूण 24 मंदिरे आहेत़ विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराजे दरवर्षी गोकुळ अष्टमीदिवशी या गावाला भेट देत होत़े हे गाव छत्रपती संभाजी महाराजांच्या राजवटीत येत होते. या गावाला मोठा ऐतिहासिक वारसा आह़े मात्र, या गावाकडे पुरातत्व खात्याने आणि सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. - कपिल किशोर कोरगावकरबस्तोडा