हॅलो 4- नरकासूर वध स्पर्धा र्शीराम बॉयसला प्रथम क्रमांक

By admin | Published: November 15, 2015 11:14 PM2015-11-15T23:14:39+5:302015-11-15T23:14:39+5:30

वास्को : कला व सांस्कृतिक संचालनालय पुरस्कृत मुरगाव हिंदू समाज र्शी महालक्ष्मी पूजनोत्सव समितीतर्फे आयोजित मुरगाव तालुका र्मयादित नरकासूर वध स्पर्धेतील पहिले बक्षीस र्शीराम बॉयस मेस्तावाडा यांना प्राप्त झाले आहे.

Hello 4- Narasakara slaughter competition, Shriram Boyce number one | हॅलो 4- नरकासूर वध स्पर्धा र्शीराम बॉयसला प्रथम क्रमांक

हॅलो 4- नरकासूर वध स्पर्धा र्शीराम बॉयसला प्रथम क्रमांक

Next
स्को : कला व सांस्कृतिक संचालनालय पुरस्कृत मुरगाव हिंदू समाज र्शी महालक्ष्मी पूजनोत्सव समितीतर्फे आयोजित मुरगाव तालुका र्मयादित नरकासूर वध स्पर्धेतील पहिले बक्षीस र्शीराम बॉयस मेस्तावाडा यांना प्राप्त झाले आहे.
धर्मशाळा मेहता हॉल येथे बक्षीस वितरण सोहळा झाला. दुसरे बक्षीस शिव प्रसादीक स्पोर्ट अँण्ड कल्चरल क्लब मायमोळे तर तिसरे बक्षीस र्शी बॉयस ऑफ दत्तवाडी ओरुले यांना प्राप्त झाले. उत्तेजनार्थ बक्षिसे अनुक्रमे शांतादुर्गा क्रीडा व कला संघ, कॉप रायडर्सर्चिखली, ड्रायव्हर हील बॉयज यांना देण्यात आली. उत्कृष्ट र्शीकृष्णाच्या भूमिकेसाठी र्शी राम बॉयज मेस्तावाडा यांची निवड करण्यात आली.
आकाशकंदील स्पर्धेतील पहिले बक्षीस र्शद्धा विलास नाईक, दुसरे बक्षीस रोहन कुंडईकर, तिसरे बक्षीस पांडुरंग भगत यांना देण्यात आले, तर उत्तेजनार्थ बक्षिसे प्रज्ञा ढवलीकर, रोहिदास बोरकर व दक्षा मयेकर यांना देण्यात आली.
बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे उत्सव समितीचे अध्यक्ष शेखर खडपकर उपस्थित होते. यावेळी मुरगाव हिंदू समाजाचे उपाध्यक्ष आत्माराम नार्वेकर, सचिव संतोष खोर्जुवेकर, खजिनदार वामन चोडणकर, उत्सव समितीचे उपाध्यक्ष हेमंत फडते, प्रशांत लोटलीकर, अनंत नाईक, सचिव प्रभाकर मुळीक, विजय नागवेकर व खजिनदार गजानन देसाई उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिवाजी सावंत तर वामन चोडणकर यांनी आभार प्रदर्शन केले. (वार्ताहर)
फोटो ओळी-
विजेत्या र्शीराम बॉयस मेस्तावाडा यांना बक्षीस देताना उत्सव समितीचे अध्यक्ष शेखर खडपकर. बाजूला इतर. (छाया : शेखर कळंगुटकर)

Web Title: Hello 4- Narasakara slaughter competition, Shriram Boyce number one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.