हॅलो रविवार- स्थित्यंतर
By admin | Published: December 13, 2015 12:07 AM2015-12-13T00:07:36+5:302015-12-13T00:07:36+5:30
दक्षिण गोव्यातील सासष्टी महालातील बाणावली या गावाला इतिहास आणि पर्यावरणाचा एकेकाळी समृद्ध वारसा लाभला होता. पोतरुगीज अमदानीत गोव्यातील बर्याच गावांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न झाला त्याला बाणावली गाव कसा अपवाद ठरणार? सोळाव्या शतकात पोतरुगिजांनी सासष्टीतल्या ज्या गावांचा इतिहास आणि संस्कृती बदलण्याचा प्रयत्न केला, त्यात बाणावलीचा समावेश होता. आज जनगणनेच्या अहवालानुसार बाणावलीचा समावेश शहरात झालेला असला तरी पूर्वी हे एक सागरकिनार्यावर वसलेले शांत आणि सुंदर गाव होते. रौप्य कांतीने चमचमणार्या वाळूची र्शीमंती मिरवणार्या या गावाला गोवा मुक्तीनंतर आलिशान हॉटेल्स आणि बंगले यांचा विळखा पडला आणि बाणावली आपली ग्रामीण संस्कृती आणि लोकजीवन हरवून बसली. र्शी विष्णूच्या दशावतारांपैकी परशुरामाने आपल्या धनुष्याद्वारे बाण सोडला आणि अ
Next
द ्षिण गोव्यातील सासष्टी महालातील बाणावली या गावाला इतिहास आणि पर्यावरणाचा एकेकाळी समृद्ध वारसा लाभला होता. पोतरुगीज अमदानीत गोव्यातील बर्याच गावांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न झाला त्याला बाणावली गाव कसा अपवाद ठरणार? सोळाव्या शतकात पोतरुगिजांनी सासष्टीतल्या ज्या गावांचा इतिहास आणि संस्कृती बदलण्याचा प्रयत्न केला, त्यात बाणावलीचा समावेश होता. आज जनगणनेच्या अहवालानुसार बाणावलीचा समावेश शहरात झालेला असला तरी पूर्वी हे एक सागरकिनार्यावर वसलेले शांत आणि सुंदर गाव होते. रौप्य कांतीने चमचमणार्या वाळूची र्शीमंती मिरवणार्या या गावाला गोवा मुक्तीनंतर आलिशान हॉटेल्स आणि बंगले यांचा विळखा पडला आणि बाणावली आपली ग्रामीण संस्कृती आणि लोकजीवन हरवून बसली. र्शी विष्णूच्या दशावतारांपैकी परशुरामाने आपल्या धनुष्याद्वारे बाण सोडला आणि अरबी सागराच्या पाण्याला मागे हटवून म्हणे मानवी समाजाच्या वसाहतीसाठी भूभागाची निर्मिती केली. परशुरामाने सोडलेला बाण जेथे पडला ती भूमी बाणावली म्हणून नावारूपास आली, असे मानले जाते. परशुरामापूर्वी गोव्यात आदिमानवाचे वास्तव्य असल्याचे पुरावे सापडलेले आहेत. सिंधू संस्कृतीशी नाते सांगणारी बाणावली हरियाणातील फतेहपूर जिल्?ात असून याच नावाची काही गावे कर्नाटकातही आहेत. मडगाव शहरापासून 5 कि.मी. अंतरावर वसलेल्या या गावाला ‘बाणावली’ हे नाव कसे प्राप्त झाले याची कथा स?ाद्री खंडात असली तरी या बाबीचे सर्मथन करणारे ऐतिहासिक पुरावे आढळलेले नाहीत.डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांना नागरी पिलीतला तारीख आणि वर्ष नसलेला एक लेख आढळला होता. त्यात या गावचे दैवत बाणेश्वर आणि ग्रामनाम बाणेवली असल्याचा संदर्भ आढळतो. पोतरुगीज पूर्वकाळात बाणेश्वराच्या मंदिरामुळे हा गाव ‘बाणेवली’ म्हणून परिचित असावा आणि कालांतराने त्याचे नाव ‘बाणावली’ आणि पोतरुगिजांनी ते ‘बेनावली’ केलेले आहे. जुन्या काळी येथे बाणेश्वर, संकेश्वर, नारायण, भैरव, सांतेरी या दैवतांबरोबर कांतारोझादेवी आणि देबना या दैवतांचे संदर्भ आढळतात. 1982 च्या दस्ताऐवजात सासष्टीत ज्या 53 ग्रामसंस्था आढळतात त्यात बाणावलीचा उल्लेख आहे. बाणावलीच्या ग्रामसंस्थेचे बारा वांगड होते. राशोल किल्ल्याचा कॅप्टन डायगो रॉड्रिग्स याने 1567 साली सासष्टीतील जी शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली, त्यात बाणावली येथील मंदिरांचा समावेश होता. 1613 आणि 1620 साली हिंदू धर्मियांना त्यांचे पारंपरिक रितीरिवाज, धर्मविधींचे पालन करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आणि त्या धामधुमीत बाणावली येथील शिव-पार्वतीची कात्यायनी आणि बाणेश्वराच्या मंदिरांचे स्थलांतर उत्तर कन्नड जिल्?ातल्या अंकोला येथे करण्यात आले. पोतरुगिजांनी आरंभलेल्या धार्मिक अन्याय आणि अत्याचारामुळे इथले नागरिक बाणावली सोडून अन्य प्रांतात गेले.1018.55 हेक्टर क्षेत्रफळ असलेले बाणावली हे कष्टकरी समुदायाचे कृषीप्रधान गाव. आपल्या गावात सदासर्वकाळ अरबी समुद्राच्या लाटा खेळत असल्याने, गावातल्या भूमीचे रक्षण व्हावे म्हणून इथल्या भूमिपुत्रांनी माडाची व्यापक प्रमाणात लागवड केली होती. गोव्यात बार्देसातल्या कळंगुट आणि सासष्टीतील बाणावलीच्या नारळाच्या प्रजातींचा एकेकाळी विशेष लौकिक होता. आज कल्पद्रुमाचे हे वैभव संकटग्रस्त आहे. इथल्या कष्टकरी जाती-जमातीने चिखलाचे बांध घालून आणि नारळाची कल्पकतेने लागवड करून इथल्या भूमीचे रक्षण केले होते. आज सागरी पर्यटनाच्या बेशिस्त विस्तारामुळे हे वैभव इतिहासजमा होण्याच्या वाटेवर आहे. कृषीप्रधान असलेल्या या गावाची आज अर्थव्यवस्था सागरी पर्यटनावरती आधारलेली आहे. दक्षिण गोव्यातल्या र्शीमंत ग्रामपंचायतीत बाणावलीचा समावेश होत असून ती अकरा सदस्यांची आहे. पंचतारांकित हॉटेल्स आणि आलिशान बंगले यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बाणावलीत देश-विदेशातून येणार्या पर्यटकांचे लोंढे सातत्याने वाढत असतात. त्यामुळे इथले रस्ते वाहनांच्या वर्दळीमुळे गजबजलेले असतात. कचरा, सांडपाणी, मलनिस्सारण गैरव्यवस्थापनामुळे बाणावलीच्या नैसर्गिक सौंदर्याला समस्यांना सामोरे जावे लागलेले आहे. दहा हाजारांपेक्षा जादा लोकसंख्या आणि मोठय़ा प्रमाणात येणारे पर्यटक यामुळे बाणावली आपली ग्रामीण संस्कृती कधीच हरवून बसली आहे. बाणावली येथील इतिहास, लोकसंस्कृतीचे अभ्यासक व्हिक्टर ?ुगो गोम्स यांनी आयुष्यातल्या कमावलेल्या पुंजीची गुंतवणूक करून पारंपरिक दळणवळणाची साधने, भांडीकुंडी, कृषी अवजारे आदींनी युक्त जे वस्तुसंग्रहालय उभे केलेले आहे, त्याने या गावाच्या लौकिकात विशेष भर घातलेली आहे. सेंद्रिय शेतीचे प्रयोग यशस्वी करून त्यांनी दाखविलेले आहेत. इथे असलेली सेंट बाप्तीस्त चर्च, जुने व नवे होली ट्रिनिटी चर्च दिमाखात उभी असून त्याशिवाय सेंट सेबेस्तियन, सेंट अँथोनी, अवर लेडी ऑफ पॅट्रोसिनो कपेल भाविकांसाठी आकर्षण ठरलेली आहेत. वैद्यकीय संशोधक म्हणून नावारूपास आलेले डॉ. फ्रोयलाना डिमेलो आणि कर्नाटकातील कॅनरा प्रांताबरोबर र्शीलंकेत ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे सेंट जोझेफ वाझ यांचा जन्म बाणावलीत झाल्याने लोकमानसात बाणावलीविषयी आदराची भावना प्रचलित आहे.दक्षिण गोव्यातल्या रूपेरी वाळूच्या किनार्यामुळे जसे पर्यटकांना कोलवाचे आकर्षण आहे, तसेच बाणावलीचेही आहे आणि गोव्याच्या सागरी पर्यटनाच्या मोहापायी आलेल्या पर्यटकांना इथल्या किनार्यावरती पहुडल्याशिवाय चैन पडत नाही. सागरातील लाटांवरची नौकेतून चित्तथरारक सफर, त्याचप्रमाणे पॅराग्लायडिंग अनुभव घेण्यासाठी पर्यटक इथे मोठय़ा संख्येने येत असतात. सागरी पर्यटनाच्या व्यवसायावर नियंत्रण न ठेवल्या कारणाने मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन यांची चलती येथे आहे. इंग्रजी जुन्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी बाणावलीसारख्या सागरकिनार्यावर देश-विदेशातून येणार्या पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. एकेकाळी सदाप्रसन्न आणि शांत असलेला हा सागरकिनारा आज आपले गतवैभव हरवून बसलेला आहे. पर्यटन कुटिरे आणि तिथे होणार्या पर्यटकांच्या गर्दीमुळे इथल्या किनार्यावर मुक्तपणे संचार करण्याचा स्थानिकांचा आनंद कधीच दुर्मीळ ठरलेला आहे. बाणावलीला इंगज्रेचे तळे, कोमोला तळे, अडसुली, दिवलेर आणि झर असे जलाशय लाभल्याने इथे बुलबुल, कोतवाल, धीवर, बगळे, सूर्यपक्षी, तांबट, कोकिळा, मैना, कीर, शिंपी, कवडा, घार, पाणकोंबड्या, चिमण्या आदी प्रजातींच्या पक्ष्यांचे दर्शन पक्षी निरीक्षकांना प्रसन्नतेचा अनुभव प्रदान करत असतो. माकड, वानर, ऊद, मुंगूस, ससा, साळिंदर, कटांदरसारखे जंगली प्राणी आणि घोणस, फुरसे, अजगर असे सरपटणारे प्राणी शहरीकरणाच्या विळख्यात सापडलेल्या बाणावलीत जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. देशी-विदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या बाणावलीचा गोमंतकीय चेहरा आज विस्मृतीच्या उंबरठय़ावर आहे.- राजेंद्र पां. केरकर