4 वर्षाहून जास्त वयाच्या मुलांनाही हेल्मेट सक्तीची शक्यता
By admin | Published: August 10, 2016 10:50 AM2016-08-10T10:50:26+5:302016-08-10T13:03:47+5:30
केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मोटर वाहन विधेयक सादर केलं. या विधेयकात सरकारने चार वर्षांहून जास्त वय असलेल्या लहान मुलांना हेल्मेट सक्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 10 - केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मोटारवाहन विधेयक सादर केलं. या विधेयकात सरकारने चार वर्षांहून जास्त वय असलेल्या लहान मुलांना हेल्मेट सक्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पगडी परिधान करणा-या शिखांना मात्र यामधून सूट देण्यात आली आहे.
14 वर्षाहून जास्त वय असलेल्या सर्वांसाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कारमध्ये सीट बेल्ट आणि अन्य सुरक्षा देण्याबद्दलही सागंण्यात आलं आहे. कोणी या नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यासंबंधी विधेयकात नमूद करण्यात आलं आहे. फक्त दंड लागू नये यासाठी अनेक दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात याचा विचार करता हेल्मेट सुरक्षितरित्या कसं घालता येईल यासंबंधीही विधेयकात सुचवण्यात आलं आहे.
वारंवार वाहतुकीचे नियम तोडणा-यांना जास्तीत जास्त दंड आणि शिक्षेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत विधेयक मांडताना विरोधकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. देशात रस्ते अपघात दररोज 400 लोकांचा मृत्यू होत असल्याची माहिती यावेळी गडकरींनी दिली. विधेयक मंजूर झाल्यास अनेक लोकांचे जीव वाचतील. ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह करणा-यांना दंड आकारण्यासोबत 3 महिन्यांसाठी परवाना रद्द करण्याचा अधिकार पोलिसांन देण्यात येणार आहे.
हेल्मेट सक्ती व्हावी असं तुम्हाला वाटतं का ? तुमच्या प्रतिक्रिया कळवा