सुशासनाच्या जोरावर देशाला नव्या उंचीवर नेऊ, दिल्ली मेट्रोच्या मेजेंटा लाइनचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:59 AM2017-12-26T03:59:38+5:302017-12-26T04:00:05+5:30

नवी दिल्ली : देश नीती, धोरणाच्या आधारावर चालतो, कुणाच्या मर्जीवर नाही, असे स्पष्ट करतानाच, सुशासनाच्या जोरावर देशाला नव्या उंचीवर नेऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.

With the help of good governance, the country's new height will be inaugurated by Neue, Delhi Metro's Magenta Line | सुशासनाच्या जोरावर देशाला नव्या उंचीवर नेऊ, दिल्ली मेट्रोच्या मेजेंटा लाइनचे उद्घाटन

सुशासनाच्या जोरावर देशाला नव्या उंचीवर नेऊ, दिल्ली मेट्रोच्या मेजेंटा लाइनचे उद्घाटन

Next

नवी दिल्ली : देश नीती, धोरणाच्या आधारावर चालतो, कुणाच्या मर्जीवर नाही, असे स्पष्ट करतानाच, सुशासनाच्या जोरावर देशाला नव्या उंचीवर नेऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. दिल्ली मेट्रोच्या १२ किमी लांंब मेजेंटा लाइनचे उद्घाटन झाल्यानंतर, एका सभेला ते संबोधित करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कधी-कधी विकासाची कामे जनहिताच्या तराजूत तोलण्याऐवजी राजकीय तराजूत तोलली जातात. राजकीय लाभ असतानाच, काम करायला हवे काय? असा प्रश्न करून ते म्हणाले की, राजकीय लाभ नसताना, देशाला अधांतरी सोडून द्यायचे काय? त्यामुळेच देशाने असे सरकार निवडले आहे, जे नीति, धोरणावर चालते. आमची कामे लोकांच्या जीवनात बदल करणारे आहेत. काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले की, हा देश समृद्ध आणि संपन्न आहे. मात्र, देशाच्या जनतेला या समृद्धीपासून दूर ठेवण्यात आले आहे.
मोदी म्हणाले की, अनेक समस्यांच्या मुळाशी शासन व्यवस्था आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, वाजपेयींच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन सुशासनासोबत देशाला नव्या उंचीवर नेण्याचा आम्ही संकल्प केला आहे. मेट्रो रेल्वेसेवेचा उल्लेख करून ते म्हणाले की, यातून कोणी उद्योगपती नव्हे, तर सामान्य लोक प्रवास करतील. मेट्रोने प्रवास करणे प्रतिष्ठेचा मुद्दा व्हायला हवा. तेव्हाच आम्ही देशाच्या अनेक समस्या सोडवू शकतो. पेट्रोलियम पदार्थ आयात करण्यावर होणारा खर्चही यामुळे कमी होईल.
>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बॉटनिकल गार्डन ते ओखला बर्ड सेंच्युरी स्टेशनच्या दरम्यान मेट्रोने प्रवासही केला. या वेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी व दिल्ली मेट्रो रेल्वेचे प्रमुख मंगू सिंह यांची उपस्थिती होती. ४ मिनिटांच्या प्रवासानंतर ते ओखला बर्ड सेंच्युरी येथे उतरले.
>नोएडात येणाºया योगींचे कौतुक
नोएडात येणाºया मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाते, असा अंधविश्वास असल्याने अनेक मुख्यमंत्री नोएडात फिरकत नाहीत. मात्र, योगी आदित्यनाथ आज या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. यावर बोलताना मोदी म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांचे मी अभिनंदन करतो. त्यांचे कपडे पाहून असा प्रचार केला जातो की, ते आधुनिक विचारांचे नाहीत, पण हा प्रचार त्यांनी खोटा ठरविला आहे.
>हा तर दिल्लीच्या जनतेचा
अपमान : सिसोदिया
दिल्ली मेट्रोच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रण न देणे म्हणजे दिल्लीच्या लोकांचा अपमान आहे, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, मेट्रोचे दर कमी करण्याची मागणी केजरीवाल मोदींकडे करतील, अशी भीती त्यांना होती. त्यामुळेच केजरीवाल यांना बोलाविले नाही.

Web Title: With the help of good governance, the country's new height will be inaugurated by Neue, Delhi Metro's Magenta Line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.