जीएसटी विधेयकही मंजूर करायला मदत करा आणि श्रेय घ्या, जेटलींचा राहुल गांधींना टोमणा
By admin | Published: March 9, 2016 11:48 AM2016-03-09T11:48:02+5:302016-03-09T11:48:02+5:30
वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) मंजूर करण्यास राहुल गांधींनी मदत करावी आणि त्याचही श्रेय घ्यावं असं म्हणत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना टोमणा मारला आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ९ - वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) मंजूर करण्यास राहुल गांधींनी मदत करावी आणि त्याचही श्रेय घ्यावं असं म्हणत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना टोमणा मारला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील (ईपीएफ) कर मी टाकलेल्या दबावामुळे मागे घेतले असं वक्तव्य राहुल गांधांनी केलं होतं.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी लोकसभेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (ईपीएफ) रक्कम काढल्यावर कर लावण्याच्या प्रस्ताव सरकार मागे घेत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर भाजपा आणि काँग्रेसमध्ये श्रेययुद्ध सुरु झाले. राहुल गांधींनी मी टाकलेल्या दबावामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हणत श्रेय घेतलं होतं. ज्यावर टीका करत संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी राहुल गांधी महत्वाची विधेयक अडवून गरिबांना दुखवत आहेत असं म्हणल होत.
अरुण जेटली यांनी ईटीव्ही नाऊला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसने सत्तेत असताना गरिबांसाठी सामाजिक सुरक्षा निर्माण करण्यासाठी काहीच केलं नसल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी सर्व श्रेय घेऊ शकतात. जीएसटी आणि इतर महत्वाची विधेयक मंजूर करण्यास त्यांनी मदत करावी आणि त्यांचंही श्रेय घ्याव. त्यांनी संसदेच्या कामात अडथळा आणू नये. ही विधेयक भाजपाची नसून देशाची आहेत असं अरुण जेटली बोलले आहेत.