संघाचा भूकंपग्रस्तांना मदतीचा हात
By Admin | Published: April 26, 2015 11:49 PM2015-04-26T23:49:57+5:302015-04-26T23:49:57+5:30
नेपाळमधील भूकंपानंतर भारताने सर्वात अगोदर मदत पोहोचविण्यास सुुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील मदतीचा हात देण्यासाठी
नागपूर : नेपाळमधील भूकंपानंतर भारताने सर्वात अगोदर मदत पोहोचविण्यास सुुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील मदतीचा हात देण्यासाठी युद्धस्तरावर तयारी सुरू केली आहे. नेमकी कशा प्रकारची मदत लागेल व त्याचे स्वरूप कसे असेल याचा आढावा घेण्यासाठी संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे रविवारी नेपाळमध्ये दाखल झाले. स्थानिक स्वयंसेवक बचाव तसेच मदतकार्याला लागले.
शनिवारी नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर तातडीने संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तेथील नुकसान लक्षात घेता संघाकडून शक्य ती मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु नुकसान नेमके कशा पद्धतीचे झाले आहे, नेमक्या कुठल्या प्रकराची मदत पुनर्वसन कार्यासाठी लागणार आहे यासंदर्भात पाहणी करण्यासाठीदत्तात्रेय होसबळे यांच्या नेतृत्वात स्वयंसेवकांचे एक पथक रविवारी काठमांडूमध्ये दाखल झाले.