मृतांच्या कुटुंबीयांना मदत देणं म्हणजे बिस्किट वाटण्याचं काम नाही- व्ही. के. सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 05:03 PM2018-04-02T17:03:59+5:302018-04-02T17:03:59+5:30
इराकमधल्या इसिसच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 38 भारतीयांचे मृतदेह घेऊन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह भारतात परतले आहेत.
नवी दिल्ली- इराकमधल्या इसिसच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 38 भारतीयांचे मृतदेह घेऊन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह भारतात परतले आहेत. विशेष विमानातून सर्व मृतदेह अमृतसरला दाखल झाले असून, त्यानंतर ते कोलकात्याकडे रवानाही करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर व्ही. के. सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
पत्रकार परिषदेत इराकमधल्या इसिसच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 38 भारतीयांच्या कुटुंबीयांच्या मदतीसंदर्भात व्ही. के सिंह यांना पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी मृत कुटुंबीयांच्या मदतीसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणं म्हणजे बिस्किट वाटण्याचं काम नाही. हा लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता तरी तुम्हाला समजलं का ?, मी तर मदतीची घोषणा कशी करू, माझ्या खिशात पेटारा थोडी आहे, असं व्ही. के. सिंह म्हणाले आहेत.
Ye biscuit baantne wala kaam nahi hai, ye admiyon ki zindagi ka sawal hai,a gayi baat samajh mein?Main abhi elaan kahan se karoon?Jeb mein koi pitaara thodi rakha hua hai: VK Singh,MoS MEA on if there would be some compensation announced today for kin of 38 Indians killed in Iraq pic.twitter.com/jQFp2IXDLW
— ANI (@ANI) April 2, 2018
जून 2014मध्ये इसिस या दहशतवादी गटाने इराकच्या मोसूल गावातून 40 भारतीयांचे अपहरण केले होते. एकाने मी बांगलादेशचा मुस्लीम असल्याचे सांगून स्वत:ची सुटका करून घेतली होती. ही माहिती स्वराज यांनी संसदेत गेल्या मार्चमध्ये सांगितली होती. या भारतीयांचे मृतदेह मोसूलच्या वायव्येकडील बदूश गावात ताब्यात घेण्यात आले, असे स्वराज म्हणाल्या होत्या. ठार मारण्यात आलेल्या 39 जणांमध्ये पंजाबचे 27, हिमाचल प्रदेशचे चार, पश्चिम बंगालचे दोन व उर्वरित बिहारचे आहेत. त्यातील 38 जणांचे मृतदेह भारतात आणण्यात आलेत. या संपूर्ण प्रक्रियेत इराक सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल व्ही के सिंह यांनी त्यांचे आभार मानले.