मदत करणे बेतले जीवावर
By admin | Published: November 22, 2015 11:16 PM2015-11-22T23:16:03+5:302015-11-22T23:16:03+5:30
दोघांना कोठडी : पैशांचा तगादा मिटविण्यासाठी केला वृध्देचा गेम
Next
द घांना कोठडी : पैशांचा तगादा मिटविण्यासाठी केला वृध्देचा गेमजळगाव: अडचणीत असलेल्याला मदतीचा हात दिला अन् त्यानेच जीव घेतल्याचे धक्कादायक वास्तव खाजोळा (ता.पाचोरा) येथील सायंकाबाई जगन मोरे (वय ५०) या वृध्द महिलेच्या खून प्रकरणात उघड झाले आहे. गाय विक्री करुन भावडूला सायंकाबाईने पाच हजार रुपये उसने दिले होते. दरम्यान, न्या.एम.व्ही.मोहळ यांनी आबा उर्फ शालिग्राम लालचंद पवार (वय ३२) व भावडू शिवाजी भील (वय २८) दोन्ही रा.खाजोळा या दाघं आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.खाजोळा शिवारात १८ नोव्हेंबर रोजी सायंकाबाईचा मृतदेह बापु पाटील यांच्या शेतात आढळून आला होता. सायंकाबाईकडून भावडूने पाच हजार रुपये घेतले होते. त्यासाठी सायंकाबाईने त्याच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. काम धंदा करीत नसल्याने पैसे देण्यास अडचणी होत्या तर आबा हा देखील बेरोजगार होता. त्यालाही पैशाची गरज होती. दोघंही मित्र असल्याने त्यांनी सायंकाबाईचा कुर्हाडीने गेम करण्याचे ठरविले. मात्र त्यामुळे अपण अडचणीत येवू शकतो अशी जाणीव झाल्याने त्यांनी तो प्लॅन रद्द केला. दोरीने गळा आवळून खून केला. या खुनानंतर दोघंही जणू आपल्याला काही माहितच नाही या आवेषात गावकर्यांसोबत फिरले. पोलीस निरीक्षक दादाराव सिनगारे,स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक संदीप पाटील, बोरसे, गणेश मराठे, सचिन विसपुते, हिरा पाटील, गजू काळे, बापुराव भोसले, रवींद्र गिरासे, राजेंद्र पाटील, शरद भालेराव, विलास पाटील, रामकृष्ण पाटील, ईश्वर सोनवणे व दीपक पाटील आदींच्या पथकाने या खुनाचा उलगडा केला.