'बसंती की इज्जत का सवाल है!', प्रचारसभेदरम्यान हेमा मालिनींचे मतदारांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 12:08 PM2018-11-21T12:08:15+5:302018-11-21T12:10:18+5:30
मध्य प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. राज्यात 15 वर्षांपासून सत्तेत असलेली भाजपा आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी काँग्रेस, दोन्ही पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे. यासाठी दोन्ही पक्षांनी आता आपले स्टार प्रचारक मैदानात उतरवले आहेत.
भोपाळ - मध्य प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. राज्यात 15 वर्षांपासून सत्तेत असलेली भाजपा आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी काँग्रेस, दोन्ही पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे. यासाठी दोन्ही पक्षांनी आता आपले स्टार प्रचारक मैदानात उतरवले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यादेखील मध्य प्रदेशातील प्रचारामध्ये व्यस्त आहेत. हरदा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार कमल पटेल यांचा त्या प्रचार करत आहेत. प्रचारसभेदरम्यान, हेमा मालिनी यांनी फिल्मी अंदाजात डायलॉगबाजी करत जनतेला कमल पटेल यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
प्रचारादरम्यान हेमा मालिनी यांनी आपल्या गाजलेल्या 'शोले' सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग 'बसंती की इज्जत का सवाल है!', म्हणत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. 1975मध्ये बॉक्सऑफिसवर आलेल्या 'शोले' सिनेमामध्ये हेमा मालिनी यांनी बसंतीची भूमिका साकारली होती. टांगा चालवताना सिनेमात त्या हा डॉयलॉग (बसंती की इज्जत का सवाल है) आपल्या घोडी उद्देशून बोलत असतात.
कमल पटेल यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या हेमा मालिनी यांनी सभेदरम्यानही ‘ये बसंती तांगेवाली आज आपके शहर में आई हैं और उसकी इज्जत का सवाल है’ अशी डायलॉगबाजी करत जनतेला भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केले.