हेमंत सोरेन यांची ३१ कोटींची जमीन ‘ईडी’ने केली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 07:35 AM2024-04-05T07:35:53+5:302024-04-05T07:36:22+5:30
Hemant Soren: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात येणारी ८.८६ एकर जमीन ‘ईडी’ने जप्त केली आहे. जमिनीची किंमत ३१ कोटी रुपये आहे.
रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात येणारी ८.८६ एकर जमीन ‘ईडी’ने जप्त केली आहे. जमिनीची किंमत ३१ कोटी रुपये आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात सोरेन व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंदविला असून, सध्या त्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हेमंत सोरेन, भानूप्रताप प्रसाद, राजकुमार पाहन, हिलारियास कछाप आणि विनोद सिंग यांच्याविरोधात ईडीने ३० मार्चला आरोपपत्र दाखल केले आहे.