इथे डॉक्टर उघडयावर करतात शवविच्छेदन
By Admin | Published: June 14, 2016 05:35 PM2016-06-14T17:35:09+5:302016-06-14T17:35:09+5:30
शवागार म्हणजे मृतदेह ठेवण्याचे ठिकाण. जिथे मृतदेहावर शवविच्छेदन होते. मृत्यूनंतर काही तासातच मृतदेह खराब होण्यास सुरुवात होते.
ऑनलाइन लोकमत
सोनपत, दि. १४ - शवागार म्हणजे मृतदेह ठेवण्याचे ठिकाण. जिथे मृतदेहावर शवविच्छेदन होते. मृत्यूनंतर काही तासातच मृतदेह खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे शवागाराची व्यवस्थित देखभाल करावी लागते. पण जिथे अशी सुविधा नसेल तिथे लोकांचे काय हाल होत असतील.
छत्तीसगडच्या सोनपतमध्ये डॉक्टरांना चक्क उघडयावर शवविच्छेदन करावे लागते. सोनपतमध्ये जे शवागार आहे त्याला साधे छप्परही नाही. त्यामुळे डॉक्टरांना उघडयावर शवविच्छेदन करावे लागत आहे. सोनपतच्या जवळपास असणा-या १०२ गावातील मृतदेहांचे इथे शवविच्छेदन होते.
या गावात बांधण्यात आलेले शवागार मोडकळीस आले असून, समाजकंटकांकडून बेकायद गोष्टींसाठी आता या जागेचा उपयोग होत आहे. शवविच्छेदन दुस-या दिवशी सकाळी होणार असेल तर, नातेवाईकांना मृतदेह तिथेच ठेऊन संपूर्ण रात्र जागून काढावी लागते. उन्हाळयामध्ये डॉक्टरांना झाडाखाली शवविच्छेदन करावे लागते. प्रशासनाच्या अनास्थेमुळे शवागारा अभावी नागरीकांचे हाल होत आहे.