इथेच तुला ठार करेन, GSTला विरोध करणा-या आमदाराला धमकी

By Admin | Published: July 5, 2017 09:49 AM2017-07-05T09:49:04+5:302017-07-05T10:45:43+5:30

जीएसटी संदर्भात जम्मू काश्मीर विधानसभेत चर्चा सुरू असताना सत्ताधारी पक्षातील मंत्र्यानं विरोधी पक्षातील आमदाराला जीवे मारण्याची धमकी दिली.

Here is the threat to the MLA who opposes the GST, to kill you | इथेच तुला ठार करेन, GSTला विरोध करणा-या आमदाराला धमकी

इथेच तुला ठार करेन, GSTला विरोध करणा-या आमदाराला धमकी

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 5 -  जीएसटीसंदर्भात जम्मू काश्मीर विधानसभेत मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा सुरू होती. चर्चा सुरू असताना सत्ताधारी-विरोधकांमध्ये एवढी जुंपली की राज्याचे मंत्री इमरान अन्सारी यांना राग अनावर झाला आणि त्यांनी विरोधी पार्टी नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार देवेंद्र राणा यांना थेट जीवे मारण्याची धमकीच सर्वांसमोर दिली. चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक चकमक सुरू होती. 
 
दरम्यान, जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देशात जीएसटीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याचसंदर्भात येथील विधानसभेत चर्चा सुरू असताना आमदार देवेंद्र राणा यांनी सभागृहातील सदस्यांना आवाहन करत ""राजकीय विचार बाजूला सारून राज्य आणि राज्यातील जनतेसाठी काय योग्य आहे, यावर सर्वाचं सहमत झाले पाहिजे, असे म्हटले. जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा पोकळ होईल"", असे सांगत त्यांनी यावेळी जीएसटीला विरोध दर्शवला. 
 
यावेळी मंत्री अन्सारी यांनी राणा यांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला.  राणा यांना आपल्या सर्व उद्योगांची जीएसटी अंतर्गत नोंदणी आधीच केलेली आहे. राणा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उद्योगांच्या नोंदणी क्रमांकाबाबतचा माहितीही मांडली. यावर आपण करचोरी केलेली नाही, असं प्रत्युत्तर राणा यांनी दिले. 
(जीएसटीबाबत तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं)
यावेळी अन्सारी यांचा राग इतका अनावर झाला की त्यांनी राणा यांना सभागृहातचे सर्वांसमोर जीवे मारण्याची धमकी दिली. मला तुमच्या सर्व गैरव्यवहारांची माहिती आहे.  तुमच्यापेक्षा कुणी मोठा चोर असू शकत नाही. तुमच्या एवढ्या संपत्तीचे स्त्रोत काय?, असा प्रश्नही अन्सारी यांनी राणा यांना विचारला. यावेळी राणा म्हणाले की, "जम्मू काश्मीरच्या हित आणि सुरक्षेसाठी माझ्यासारखे कित्येक जण जीव द्यायला तयार आहेत".
 
(ऐतिहासिक! आजपासून जीएसटी पर्व सुरू)
देशभरात लागू जीएसटी कर प्रणाली 
 
 
1 जुलैपासून देशभरात जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर अखेर लागू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यात आली. जीएसटीच्या निमित्ताने आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे. हा खऱ्या अर्थाने गुड अँड सिंपल टॅक्स आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ग्वाहीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अप्रत्यक्ष दुजोरा देत चौदा वर्षांची एक यात्रा सफळ संपूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. त्या बरोबरीनेच मध्यरात्रीच्या ठोक्याला संसदेच्या सेंट्रल हॉलमधील ऐतिहासिक सोहळ्याद्वारे जीएसटी अर्थात गुड्स अ‍ॅड सर्व्हिस टॅक्स ही नवी कररचना देशभरात लागू झाली.
 
पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, जीएसटी केवळ आर्थिक सुधारणा नसून सामाजिक सुधारणेचे प्रतीक आहे. यातून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हे स्वप्न केंद्र आणि राज्य मिळून साकार करणार आहेत.
 
जीएसटीचा अर्थ काय हे सांगताना त्यांनी गुड अँड सिम्पल टॅक्स असा नवा फुलफॉर्म पेश केला. भ्रष्टाचाराला आळा घालणारी जीएसटी हे कोणत्याही एका पक्षाचे वा, एका नेत्याचे नव्हे, तर सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे, असंही मोदी यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Here is the threat to the MLA who opposes the GST, to kill you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.