अरे! उत्तर प्रदेश में कहाँ हैं सुरक्षा; जया बच्चन यांची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 04:05 PM2019-12-05T16:05:34+5:302019-12-05T16:08:20+5:30
उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार पीडितेला जिवंत जाळलं
नवी दिल्ली - हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशात खळबळ माजलेली असताना उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने ज्या पाच जणांवर बलात्काराचा आरोप केला आहे, त्यांनीच महिलेवर हल्ला करत हे कृत्य केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनला जात असताना रस्त्यात आरोपींनी तिला थांबवलं आणि मारहाण केली आणि भोसकलं. तसंच जिवंत जाळलं आणि पळ काढला. पीडित महिला ८० टक्के भाजली असून उन्नाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर कानपूर येथील एलएलआर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या प्रकरणावर समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी उत्तर प्रदेशातील सुरक्षेवर यक्ष प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, अरे! उत्तर प्रदेश में कहाँ सुरक्षा हैं? किसी किसी कि सुरक्षा नाही हैं.
जया बच्चन यांनी सांगितले की, राज्यसभेत सुद्धा या विषयावर आवाज उठवता येत नाही. उठवला आवाज तर म्हणतात कठोर भाषा वापरली. हे काय होतंय? जर आम्ही या प्रकरणावर आवाज उठविण्यासाठी कटू शब्द वापरले तर तुम्हाला असं बोलायला नको असं सांगितलं जातं. आता मला असं वाटतं रागाच्या भारत तुम्ही माझ्यासमोर उभे आहेत, तर तुम्हाला पकडून मारावं. तसेच उत्तर प्रदेशात कुठेय सुरक्षा? कोणीही सुरक्षित नाहीय, तुम्हाला अशा घटना सांगेन की आश्चर्य व्यक्त कराल, असे जया बच्चन म्हणाल्या.
डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची अतिशय निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे. हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तरुणीला जाळून मारण्यात आल्याची घटना घडली. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. संपूर्ण देशभरातून सोशल मीडियावर या खळबळजनक घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यसभेतही उमटले आहेत. या घटनेनंतर राज्यसभेत खासदारांनी आपला संताप व्यक्त केला होता. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर भाष्य करत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात ठार करा असं जया बच्चन यांनी म्हटलं. तसेच हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर सरकारने ठोस उत्तर द्यावं असंही म्हटलं. त्यानंतर आता उन्नाव येथील सामूहिक बलात्कार आणि जाळून मारल्याच्या घटनेवर जया बच्चन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
#WATCH Jaya Bachchan, Samajwadi Party MP on crimes against women in Uttar Pradesh: Arrey Uttar Pradesh mein kahaan suraksha hai? Kisi ki suraksha nahi hai. Abhi aapko ghatnaye bataungi UP ki to aap chaunk jayenge. https://t.co/OBiWOrScaT
— ANI (@ANI) December 5, 2019