मुंबईतही आता हायटेक प्रयोगशाळा; कोरोना चाचण्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 07:06 AM2020-07-28T07:06:58+5:302020-07-28T07:07:15+5:30

कोरोना चाचण्यांची क्षमता वाढणार : यांत्रिक पद्धतीने होणार काम, रिअल टाइम देखरेख

Hi-tech laboratory in Mumbai too for corona tests | मुंबईतही आता हायटेक प्रयोगशाळा; कोरोना चाचण्या वाढणार

मुंबईतही आता हायटेक प्रयोगशाळा; कोरोना चाचण्या वाढणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे, तर शहर-उपनगरांत आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक
कोरोना चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून चाचण्यांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उद्घाटन केलेल्या परळ येथील आयसीएमआर-राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत अद्ययावत प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.


या प्रयोगशाळेत दिवसाला तीन पाळ्यांमध्ये कोविडच्या १२०० चाचण्या केल्या जातील. या प्रयोगशाळेत ऌ्रॅँ ळँ१ङ्म४ॅँस्र४३ उडश्कऊ-19 ही सुविधा आहे. येथील संपूर्ण प्रक्रिया यांत्रिक पद्धतीने होत असल्याने चाचणीचा वेग तर वाढतोच शिवाय प्रत्यक्ष हाताळणी न झाल्याने या केंद्रातील व्यक्ती सुरक्षित राहतात. एकदा नमुने या यंत्रात टाकले की कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय किंवा अडथळ्याशिवाय प्रक्रिया सुरू होते आणि अव्याहतपणे सुरू राहते. रिमोट एक्सेस पद्धतीने चाचणीचे अहवाल आणि विश्लेषण प्राप्त होते. यात प्रक्रियेवर रिअल टाइम देखरेख ठेवता येते.


या नव्या प्रणालीत इतर रोगांना कारणीभूत ठरणारे जीवाणू किंवा विषाणू यांच्याबाबतीतदेखील नमुन्यांची चाचणी करता येते, जसे की, एचआयव्ही, एचसीव्ही, सीएमव्ही सद्य:परिस्थितीत राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधानमध्ये आरटीपीसीआरवर आधारित प्रयोगशाळेत २०० चाचण्या दिवसाला होऊ शकतात. महामारीनंतर हेपेटायटीस बी आणि सी, एचआयव्ही, मायक्रोबॅक्टेरियम क्षयरोग, सायटोमेगाल व्हायरस, क्लेमिडिया, निसेरिया आणि डेंग्यू चाचणी घेण्यास सक्षम असतील.


कोलकाता, नोएडातही प्रयोगशाळा
परळमधील या संस्थेने नुकतीच ५० वर्षे पूर्ण केली असून देशातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्माला घालण्याचा मान या संस्थेकडे जातो. मुंबई सोबतच सोमवारी कोलकाता आणि नोएडा येथील हायटेक प्रयोगशाळांचेही उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले.

Web Title: Hi-tech laboratory in Mumbai too for corona tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.