खाद्य व्यावसायिकांना हायकोर्टाचा दिलासा
By admin | Published: February 18, 2015 11:53 PM2015-02-18T23:53:45+5:302015-02-18T23:53:45+5:30
नागपूर : एकाच परिसरात एकापेक्षा अधिक प्रतिष्ठाने चालविणाऱ्या खाद्य व्यावसायिकांना प्रत्येक प्रतिष्ठानासाठी स्वतंत्र परवाना घेण्याची सक्ती करू नये, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला दिले आहेत.
Next
न गपूर : एकाच परिसरात एकापेक्षा अधिक प्रतिष्ठाने चालविणाऱ्या खाद्य व्यावसायिकांना प्रत्येक प्रतिष्ठानासाठी स्वतंत्र परवाना घेण्याची सक्ती करू नये, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला दिले आहेत. एकापेक्षा अधिक प्रतिष्ठाने संचालित करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांना प्रत्येक प्रतिष्ठानासाठी स्वतंत्र परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. याविरुद्ध नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, नागपूर इतवारी किराणा व्यापारी संघटना व इतरांनी रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावणीची संधी दिल्यानंतर या प्रकरणावर कायद्यानुसार योग्य तो निर्णय घेण्याचे शासनाला निर्देश देऊन याचिका निकाली काढली आहे. वरील अंतरिम आदेश शासनाचा निर्णय होतपर्यंतच लागू राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित एका प्रकरणात अशाप्रकारची सक्ती अवैध ठरविल्याचे याचिकाकर्त्याच्या वकिलाने सुनावणीदरम्यान सांगितले. सरकारी वकिलाने शासन याप्रकरणी योग्य निर्णय घेईल, अशी ग्वाही न्यायालयाला दिली.